kalyan kale and bjp | Sarkarnama

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या समर्थकांच्या हाती कमळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. पिसादेवीचे उपसरपंच भाऊसाहेब काळे यांच्यासह कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष अलका पळकसर, आत्मराम पळसकर आदींनी कॉंग्रेसची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला. 

सावंगी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने फुलंब्री मतदार संघातील 76.40 कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामाचे भूमिपूजन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात माजी आमदार कल्याण काळे यांचे समर्थक मानले जाणारे पिसादेवीचे उपसरपंच, आत्माराम पळसकर, गणेश पळकसर, अजिनाथ धामणे,यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी वाघ, कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष अलका पळसकर यांच्यासह शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी विधानसभा लढवू इच्छिणारे डॉ. कल्याण काळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. 

काळेच्या समर्थकामध्ये अनेक दिवसापासून खदखद होती. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्यामूळे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधून सुरु असलेले आऊटगोईंग ही डॉ. कल्याण काळेसाठी धोक्‍यांची घंटा समजली जात असून हरिभाऊ बागडे यांचे पारडे जड होणार असल्याची चर्चा आहे. 

बाजार समितीत बागडेंनी दिली होती काळेना मात 
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर डॉ. कल्याण काळे यांचे वर्चस्व होते. यात हरिभाऊ बागडे यांनी 11 ऑगस्ट 2017 ला कॉंग्रेस संचालकाला आपल्या बाजूने करत सत्तांतर घडवले होते. कॉंग्रेसचे संचालक असलेले राधाकिसन पठाडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना भाजप मध्ये आणत 22 ऑगस्टला बाजार समितीत 13 विरूध्द शुन्य एवढ्या मतांनी कॉंग्रेस सभापतीवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर राधाकिसन पठाडे यांना सभापती पदावर बसवत कल्याण काळे यांना दणका दिला होता. 
 
संबंधित लेख