लाचखोर घरतवरून भाजपमध्ये दोन गट 

लाचखोर घरतवरून भाजपमध्ये दोन गट 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा लाचखोर अधिकारी संजय घरत याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक व्हावी यासाठी राज्यमंत्री तथा भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस पत्र पाठविल्याचे वृत्त `सकाळ'ने पुराव्यासह प्रसिद्ध केले होते. मात्र, असे असले तरी पश्चिमेचे भाजपाचे आमदार नरेंद्र पवार व कल्याण पूर्वचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी नेहमी घरतच्या विरोधात भूमिका घेतली होती.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा लाचखोर अधिकारी संजय घरत याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक व्हावी यासाठी राज्यमंत्री  तथा भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस पत्र पाठविल्याचे वृत्त `सकाळ'ने पुराव्यासह प्रसिद्ध केले होते. मात्र, असे असले तरी पश्चिमेचे भाजपाचे आमदार नरेंद्र पवार व कल्याण पूर्वचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी नेहमी  घरतच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे घरतवरून भाजपामध्येच  दोन  गट असल्याचे समोर आले आहे. 

आगामी काळात पालिकेत घरतला पुन्हा पायघड्या गेल्या तर यावरून भाजपमध्येच  अंतर्गत रस्सीखेच होण्याची चिन्ह आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांनी विविध घोटाळ्यांच्या आरोपावरून घरतची  चौकशी सुरु असून  त्याला  अतिरिक्त आयुक्तपदी  बढती देऊ नये अशा आशयाचे पत्र  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले  होते. या वृत्ताला गायकवाड यांनीही दुजोरा  दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून   मतदारसंघात राबविण्यात  येणाऱ्या   विविध विकास प्रकल्प महापालिका प्रशासनाचे दुवा असलेले  अतिरिक आयुक्त  घरत यांनी या सर्व विकासकामांचे श्रेय पळविले असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. त्यामुळे पवार आणि घरत यांच्यात चांगलाच कलगीतुरा  रंगला  होता. लाच घेताना घरत पकडला गेल्यामुळे  या कारवाईचे  जाहीरपणे स्वागतही पवार यांनी केले. 

एकीकडे  कल्याणकर आमदार  घरतच्या  कारवाईचे स्वागत करत असताना दुसरीकडे डोंबिवलीकर  आमदारांनी मात्र यावर चुप्पी साधण्यास  पसंती  दिली. 

पायघड्या घातल्यास  विरोध करणार
आगामी काळात  घरतला पुन्हा पालिकेच्या सेवेत  घेण्यासाठी पायघड्या घातल्या गेल्या  तर  यास आपण कडाडून विरोध करणार असल्याचे गायकवाड आणि पवार यांनी `सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत आमदार रवींद्र चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आगामी काळात घरतला पुन्हा सेवेत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्यास  कल्याणकर आणि डोंबिवलीकरांमध्ये  चांगलीच रस्सीखेच  होण्याची चिन्ह आहेत. 

दरम्यान, डोंबिवलीतील आमदारांनीच घरतची शिफारस केल्यामुळे  माध्यमांना उत्तरे देताना  डोंबिवलीतील भाजप नगरसेवकांची चांगलीच भंबेरी उडत आहे. 

घरतची लाचखोरी हा निर्लज्जपणाचा कळस आहे. येणाऱ्या अधिवेशनात लाचखोर अधिकाऱ्यांसाठी  पालिकेचे दार कायमचे बंद असले पाहिजे. लाचखोर अधिकारी पुन्हा पालिकेत येऊन  महत्वाच्या खात्यात रुजू होतात. हा नियम सर्व राज्यभरात  बदलण्यास यावा यासाठी येणाऱ्या अधिवेशनात  आवाज उठवणार आहे. याबाबतची तयारीही सुरू आहे.
- नरेंद्र पवार, आमदार, कल्याण पश्चिम

घरतची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक होऊ नये  यासाठी  मी मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना माझा नेहमीच विरोध आहे. घरतला  पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला तर तीव्र विरोध केला जाईल.
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व

राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com