kalpanaraje bhonsale | Sarkarnama

राजमातांनी घेतला विकासकामांचा आढावा 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 मार्च 2017

सातारा शहरासह जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतला.

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतला. यावेळी सर्व कामे कोणी मंजूर केलीत याची जाणीव करून देत ती चांगल्या दर्जाची व्हावीत, अशी सक्त सूचनाही त्यांनी केली. 

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या आढावा बैठकीत राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यासमवेत नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, बाळासाहेब चोरगे, संदीप शिंदे, समृद्धी जाधव, पौर्णिमा फाळके, तसेच सातारा विकास आघाडीचे पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कल्पनाराजे भोसले यांनी विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मार्चअखेर असल्याने मंजूर झालेला निधी मागे जाण्याची अधिक भीती असते. हे होऊ नये सर्व निधी कामांवर खर्ची पडावा, यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक तत्परतेने कामे करावीत, अशी सूचना करून कल्पनाराजे म्हणाल्या, साताऱ्यातील लोकांनी पालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सातारा विकास आघाडीला जी संधी दिली. त्या मतदारांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी त्यांच्या विविध समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावा. तसेच सातारा स्मार्ट सिटी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टरची अपुरी संख्या, प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या वेळेत सर्व ठिकाणी एसटी न येणे या बाबींवर विशेष लक्ष देण्यासाठी थेट जनतेत जाऊन त्यांच्या सूचना, समस्या समजून घेण्यासाठी आता गटनिहाय जनता दरबार घेण्याचा निर्णय राजमातांनी घेतला. तसेच या जनता दरबारास सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे
सांगितले. 
 

संबंधित लेख