kalasakar custudy not cbi | Sarkarnama

कळसकरचा ताबा "सीबीआय'ला नाही 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई ः नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात चौकशीसाठी ताबा मिळावा, यासाठी सीबीआयने केलेला अर्ज विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. हा अर्ज कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असल्याचे मत नोंदवत कळसकर 3 सप्टेंबरपर्यंत दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

कळसकर आणि डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरे या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यासाठी एटीएसच्या ताब्यात असलेल्या कळसकरचा ताबा मिळावा, असा अर्ज सीबीआयने केला होता. अंदुरेची पोलिस कोठडीची मुदत 30 ऑगस्टला संपत आहे. त्यापूर्वी कळसकरचा ताबा मिळावा, असे त्यात नमूद होते. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण संवेदनशील असल्याने सीबीआयला आरोपीची चौकशी करताना खबरदारी बाळगावी लागत आहे. 

पाच दिवस वाया का घालवले? 
पुण्याच्या न्यायालयाने कळसकरविरोधात न्यायालयात हजर राहण्यासाठीचे (प्रॉडक्‍शन वॉरंट) जारी करण्यापूर्वी सीबीआयने त्याला अटक का केली नाही किंवा पुणे न्यायालयात अर्ज करून त्यांच्याकडून ताबा का मिळविला नाही, त्यासाठी पाच दिवस का वाया घालवले, असे प्रश्‍न न्यायालयाने विचारले. 

संबंधित लेख