kakasaheb shinde and maratha morcha | Sarkarnama

शहीद शिंदे यांच्या भावाला नोकरी देण्यास " खास बाब ' म्हणून मान्यता

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गंगापुर तालुक्‍यातील कानडगाव येथील तरूण काकासाहेब शिंदे यांनी कायगांव टोका येथील गोदापात्रात जलसमाधी घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व त्यांचे बंधू अविनाश शिंदे यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात अविनाश शिंदे यांना कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आल्यानंतर शासनाने नुकतीच त्याला खास बाब म्हणून मान्यता दिली. 

मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यभरात पेटले असतांना औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव टोका येथे जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानूसार गोदावरी पुलावर आंदोलन सुरू असतांना गंगापूर तालुक्‍यातील कानडगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी गोदापात्र उडी घेत जलसमाधी घेतली होती. या घटनेनंतर आंदोलकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. शासनाने या संदर्भात दिलेल्या लेखी आश्‍वासनात काकासाहेब यांचे भाऊ अविनाश यांना शैक्षणिक पात्रतेनूसार नोकरी देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. 

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश चव्हाण यांनी अविनाश शिंदे यांना तात्काळ माध्यमिक शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिली होती. अविनाश शिंदे नोकरीवर रूजू देखील झाले होते. परंतु या नियुक्तीस शासन मान्यता नसल्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत विशेष बाब म्हणून या नियुक्तीस मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. शिक्षकेतर पदांच्या भरतीवर बंदी असल्यामुळे शासनाने " खास बाब ' म्हणून अविनाश शिंदे यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. या संदर्भातील आदेश 7 डिसेंबर रोजी शिक्षण संचालक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. 
 
संबंधित लेख