kakasaheb shinde | Sarkarnama

शहीद काकासाहेब शिंदे आज हवे होते, भावाच्या आठवणीने अविनाश शिंदे गहिवरले

जगदीश पानसरे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : प्रदीर्घ लढा आणि चाळीसहून अधिक तरूणांच्या बलिदानानंतर मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. माझे बंधू काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. आज आरक्षण जाहीर झाले तेव्हा ते असायला हवे होते अशी भावूक प्रतिक्रिया शहिद काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजुर झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष सुरू आहे. पण मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकायलाच हवे. तरच शहीद काकासाहेब शिंदे यांच्यासह ज्या मराठा तरूणांनी बलिदान दिले ते सार्थकी लागेल अन्यथा ते व्यर्थ जाईल अशी भिती देखील त्यांनी व्यक्त केली. 

मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्‍यातील कानडगावचे तरूण काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथील गोदापात्रात उडी घेत जलसमाधी घेतली होती. काकासाहेब शहीद झाल्यानंतर हे लोण राज्यभरात पसरले आणि उद्विग्न झालेल्या चाळीसवर तरूणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले होते. आज सरकारने मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर शहीद काकासाहेब शिंदे यांचे बंधू अविनाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता काकासाहेबांच्या आठवणीने ते भावूक झाले. 

मराठा आरक्षण जाहीर झाले ते पहायला आज काकासाहेब आपल्यात असायला हवे होते. पण सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले तरच ती खऱ्या अर्थाने काकासाहेबांना श्रध्दांजली ठरेल आणि समाजाला न्याय मिळेल. मुळात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे हीच मागणी होती. कारण ओबीसीतून दिल्या जाणाऱ्या आरक्षणालाच घटनेचा आधार आहे, आणि तेच न्यायालयात देखील टिकेल. आता स्वतंत्र जाहीर केलेले आरक्षण न्यायालयात कसे टिकेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. त्यानंतरच मराठा समाजाने जल्लोष करावा असे आवाहन देखील अविनाश शिंदे यांनी केले. 

मी सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत.. 
काकासाहेब शहीद झाल्यानंतर सरकारने माझ्या कुटुंबियाला 25 लाखांची मदत आणि मला सरकारी नोकरी देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. जाहीर केलेल्या मदतीपैकी 10 लाख रुपये माझ्या कुटुंबाला मिळाले आहेत. सरकारी नोकरीच्या मी अद्यापही प्रतिक्षेत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार व मराठावाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश चव्हाण यांनी मला त्यांच्या संस्थेत नोकरी दिली आहे. तीन महिन्यापासून मी तिथे रूजू झालो आहे. पण वेतन सुरू होण्यासाठी सरकारची मान्यता आवश्‍यक असल्याचेही अविनाश शिंदे यांनी सांगितले. 

संबंधित लेख