Kailas Patil Remembers Balasaheb Thakre | Sarkarnama

बाळासाहेब म्हणाले , कैलास तू साखर कारखानदाराला पाडलंस खरा मर्द मावळा !

कैलास पाटील , जिल्हाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस   औरंगाबाद 
बुधवार, 23 जानेवारी 2019

कैलास पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत . १९९० मध्ये ते शिवसेनेतर्फे गंगापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते . त्यांनी शिवसेनाप्रमुख कै . बाळासाहेब ठाकरे यांची सांगितलेली आठवण . 

औरंगाबादः " शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझी पहिली भेट गंगापूरचा तालुकाध्यक्ष झाल्यावर झाली. अवघ्या दोन तीन मिनिटांची ही भेट. मधुकर सरपोतदार, कै . मोरेश्‍वर सावे आणि छगन भुजबळ यांनी माझ्या नावाची शिफारस साहेबांकडे केली आणि मला 1990 मध्ये गंगापूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली. स्व. साहेबराव पाटील डोणगांवकर यांचा साडेसोळा हजार मतांनी पराभव करून मी निवडून  आलो.

1986 च्या रायगड येथील शिवसेनेच्या अधिवेशनात सहभागी झालो आणि शिवसैनिक म्हणून काम करू लागलो. वर्षभराने माझ्या गंगापूर तालुकाध्यक्ष म्हणून जबादारी सोपवण्यात आली. पक्षवाढीचे काम करत असतांनाच सामाजिक कार्यामध्ये देखील स्वःताला झोकून दिले. बाळासाहेबांची 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण ही शिकवण अंगीकारली.

तालुक्‍यात घेतलेल्या मेहनतीचे फळ 1990 मध्ये गंगापूरमधून विधानसभेच्या उमेदवारीने मिळाले. तोपर्यंत माझा आणि साहेबांचा फारसा परिचय नव्हता. मधुकर सरपोतदार, मोरेश्‍वर सावे आणि छगन भुजबळ साहेबांनी माझ्या नावाची शिफारस केली आणि उमेदवारीची माळ गळ्यात पडली. गंगापूर साखर कारखान्याचे साहेबराव पाटील डोणगांवकर यांच्यांशी लढत झाली. तालुक्‍यातील जनतेनेने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत साडेसोळा हजार मताधिक्‍याने मला निवडणून दिले.

आमदार झाल्यावर बाळासाहेबांचे आशिर्वाद घ्यायला मातोश्रीवर जायचे ठरले. सुभाष पाटील, बबनराव वाघचौरे यांच्यासोबत मुंबईला साहेबांना भेटायला गेलो.  पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला, शिवसेनेच्या नेत्यांनी हे गंगापूरचे आमदार अशी ओळख करू दिली. तोपर्यंत गंगापूरमधील विजयाची माहिती साहेबांनी घेतली होती.

साहेबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.ते म्हणाले , कैलास ,साखर कारखानदाराला पाडलंस  तू खरा मर्द मावळा आहेस' अशी शाबसकी दिली आणि माझे ऊर भरून आले. आजही हा प्रसंग माझ्या मनात घर करून आहे    सुभाष पाटील, बबनराव वाघचौरे यांना सोबत घेऊन मुंबईला गेलो.  
विजयाचे कुंकु माथ्यावर लावत बाळासाहेबांनी पाठीवर थाप मारली.  साहेबांच्या तोंडून निघालेल्या या शब्दाने स्फुरण चढले. 

शब्दांकन  : जगदीश पानसरे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख