kadegaon khot press | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

माझी चिंता वाहण्यास फडणवीस समर्थ : खोत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सदाभाऊ हा लहान माणूस आहे. त्यासाठी शक्ती खर्च करु नये. त्यांना माझी फार चिंता लागली आहे. माझी चिंता वाहणारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत.' अशा शब्दांत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. 

कडेगाव (सांगली) : "सदाभाऊ हा लहान माणूस आहे. त्यासाठी शक्ती खर्च करु नये. त्यांना माझी फार चिंता लागली आहे. माझी चिंता वाहणारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत.' अशा शब्दांत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. 

इस्लामपूर येथील मेळाव्यात खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला खोत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. 
खोत म्हणाले, "माझ्या कामाला सुरुवात करुन सहा ते सात महिने झाले. माझा आमदार फंड मी राज्यभर दिलेला आहे. पंचवीस पंधरा योजनेतील पैसे मी माढा आणि वाळवा तालुक्‍यात दिले आहेत. माझा आमदार फंड मी अजूनही पुर्ण खर्च केलेला नाही. आता तो करणार आहे. इतर कामे सर्व प्रोसेसमध्ये आहेत. तळातल्या माणसाच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेवून आम्ही विकासाला सुरुवात केलेली आहे. सात महिन्यात माझी दुकानदारी जर कोणाला दिसत असेल तर बारा वर्षामध्ये तुम्ही या पध्दतीनेच वागला का काय? मी माझी कामे ही त्या गावातील कार्यकर्त्यांना देण्याचे काम करीत असतो. ही माझ्या कामाची पध्दत आहे.' 

संबंधित लेख