kadar malbari speech in maratha agitation | Sarkarnama

#MaharashtraBandh ज्या दिवशी मराठा आरक्षण मिळेल, त्याच दिवशी खरी ईद : मलबारी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. 

कोल्हापूर : मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. 

मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. सायंकाळी दसरा चौकात मलबारी यांचे भाषण झाले. "तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय' अशी भाषणाची सुरवात होताच तरुणांनी त्यांच्या सुरात सूर मिसळून "जय जिजाऊ, जय शिवराय' अशी घोषणा दिली. 

मलबारी म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी छोटासा मावळा आहे. ज्या मातीत जन्म घेतला, त्या मातीशी इमान राखण्याचा संदेश महंमद पैगंबर यांनी आम्हाला दिला. आमच्या वाट्याचे पाच टक्के आरक्षण आहे, ते मराठा समाज अर्थात आमच्या मोठ्या भावाला देऊन टाका. राज्यकर्त्यांनी मोक्‍याची पदे आपल्या पदरात पाडून मराठा समाजाला अंधारात नेऊन टाकले. मुस्लिम समाज पूर्वी मराठा समाजासोबत होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोबत राहू. आरक्षणाच्या रूपाने भाकरी ज्या दिवशी मराठ्यांच्या ताटात पडेल त्या दिवशी आमची खरी ईद साजरी होईल.'' 

संबंधित लेख