k chandrshekhar ratains telangana | Sarkarnama

के. चंद्रशेखर राव ठरले खरे हिरो!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव खरे हिरो ठरले आहेत.  निवडणुका झालेल्या पाच राज्यांतील इतर चार मुख्यमंत्री आपली सत्ता गमाविण्याच्या धोक्यात असताना राव यांनी आपला किल्ला मजबूत ठेवला आहे.

पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव खरे हिरो ठरले आहेत.  निवडणुका झालेल्या पाच राज्यांतील इतर चार मुख्यमंत्री आपली सत्ता गमाविण्याच्या धोक्यात असताना राव यांनी आपला किल्ला मजबूत ठेवला आहे.

राव यांनी विधानसभा मुदतपूर्व बरखास्त केली होती. मतदारांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. तेलगू देसम आणि काॅंग्रेस यांची युती होऊनही राव यांच्या टीआरएससमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. तेलंगणातील एकूण 119 जागांपैकी टीआरएसने 80 , भाजप तीन आणि काॅंग्रेस आघाडी 26 जागांवर आघाडी राखली आहे. हाच कौल कायम राहिला तर राव हे दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

या राज्यातील मुस्लिम समाजही राव यांच्या मागे असल्याचे निकालावरून दिसत आहे. एमआयएमचे ओवेसी यांनीही मतमोजणी सुरू झाल्यानंतर राव यांची भेट घेतली होती. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांची सत्ता गेल्यात जमा आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची सत्ता धोक्यात आहे. या पार्श्वभूमीवर राव यांचे यश महत्त्वाचे आहे.

संबंधित लेख