Junction Aanganwadi Gets Electricity | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नाने जंक्शनच्या अंगणवाडीमध्ये वीजेचा लखलखाट  

राजकुमार थोरात 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

जिल्हातील बहुतांश अंगणवाडीमध्ये वीज व पाण्याची उपलब्धता नाही. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरती होत असुन चिमुरड्या मुलांना अपुऱ्या प्रकाशामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. खासदार सुळे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये वीज व पाण्याची सोय करण्याचे अभियानच हाती घेतले आहे.

वालचंदनगर : खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडीमध्ये वीज व पाण्याबाबत सुरु केलेल्या अभियानाला यश येवू लागले आहेत. इंदापूर तालुक्यातील वीज असणारी पहिली अंगणवाडी होण्याचा बहुमान जंक्शनच्या अंगणवाडीने मिळविला आहे. खासदार सुळे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते विजेचे बटन दाबुन वीज सुरु करण्यात आली.

जिल्हातील बहुतांश अंगणवाडीमध्ये वीज व पाण्याची उपलब्धता नाही. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरती होत असुन चिमुरड्या मुलांना अपुऱ्या प्रकाशामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. खासदार सुळे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये वीज व पाण्याची सोय करण्याचे अभियानच हाती घेतले आहे. गेल्या महिन्यामुळे सुळे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून अंगणवाडीमध्ये वीज व पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देवून दिवाळीपूर्वी हे काम मार्गी लावण्यास सांगितले.

या अभियानातंर्गत प्रशासनातील सर्व अधिकारी वेगाने काम करु लागले आहेत. जंक्शन येथील अंगणवाडीमध्ये वीजेचा मिटर बसविण्यात आला असुन अंगणवाडीच्या खोलीमध्ये विजेच लखलखाट झाला आहे. बुधवार (ता. ५) रोजी खासदार सुळे यांच्या प्रमुख  उपस्थितीमध्ये आमदार  भरणे यांच्या हस्ते बटन दाबुन वीज सुरु करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, शुभम निंबाळकर, रेहना मुलाणी, सागर मिसाळ, डॉ. संजय लोंढे ,तुषार घाडगे, अंगणवाडी सेविका गौरी पाटोळे, दशरथ बनकर उपस्थित होते

अंगणवाडीचे बिल ग्रामपंचायत भरणार
तालुक्यामध्ये ४१७ अंगणवाड्या आहेत. सर्व अंगणवाडीमध्ये वीज 
 उपलब्ध करुन देण्याचे काम प्रगतीपथवर आहे. ३० सप्टेंबर पर्यत सर्व अंगणवाडीमध्ये वीज व पाणी असणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन महिला व बाल कल्याण विभागातर्फे दहा टक्के निधी ग्रामपंचायतीला दिला जातो. या निधीतुन विजेचे बिल भरणार असल्याचे अतिरिक्त गटविकासधिकारी  विनायक गुळवे यांनी 
सांगितले. 

देशात पहिला क्रंमाक मिळवा
इंदापूर तालुक्याने तालुक्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये वीज व पाणी उपलब्ध करुन देवून देशामध्ये पहिला तालुका होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सुळे यांनी केले.

जंक्शन (ता.इंदापूर) येथील अंगणवाडीमध्ये बटन दाबून वीज सुरु करताना आमदार भरणे, खासदार सुळे, सभापती माने व मान्यवर.

संबंधित लेख