'लॉंग मार्च' फेम कॉम्रेड जे. पी गावीत दहाव्यांदा विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार! 

राजकारणात पराभवाने खचणारे अन्‌ विजयाने हुरळून जाणारे नेते थोडे नाहीत. मात्र यामध्ये आमदार जे. पी. गावीत हे अपवाद असलेले अन्‌ सतत नवे रेकॉर्ड करणारे ठरणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आमदार गावीत येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्रआहेत. यंदाची त्यांची दहावी निवडणूक आहे.
'लॉंग मार्च' फेम कॉम्रेड जे. पी गावीत दहाव्यांदा विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार! 

नाशिक : राजकारणात पराभवाने खचणारे अन्‌ विजयाने हुरळून जाणारे नेते थोडे नाहीत. मात्र यामध्ये आमदार जे. पी. गावीत हे अपवाद असलेले अन्‌ सतत नवे रेकॉर्ड करणारे ठरणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आमदार गावीत येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र आहेत. यंदाची त्यांची दहावी निवडणूक आहे. नऊ पैकी सात वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले गावीत आजही सतत मोर्चे अन्‌ लोकांच्या प्रश्‍नांसाठीच संघर्षरत असल्याने नाशिक जिलह्यातील तो एक विक्रम ठरणार आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आमदार जे. पी. गावीत दिंडोरी मतदारसंघातून पराभूत झाले. मात्र त्यांना आपल्या घरच्या कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात सर्वाधीक मते घेऊन ते पहिल्या क्रमांकावर राहिले. आता आमदार जे. पी. गावीत आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी करीत आहे. ही त्यांची दहावी निवडणूक आहे. 1978 मध्ये ते सर्वप्रथम सुरगाणा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर सलग नऊ निवडणूका लढवल्या. त्यात 1995 आणि 1999 या दोन निवडणूकांचा अपवाद वगळल्यास सात निवडणूका ते जिंकले. सातवेळा आमदार असलेले गावीत केडर बेस पक्ष व यंत्रणेच्या बळावर दहाव्यांदा मतदारांना सामोरे जाणार आहेत. यावेळीही लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपणच विजयी होऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, वनजमिनींचे दावे तातडीने निकालात काढावे आणि वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी कराव्यात यांसह विविध प्रश्‍नांसाठी त्यांनी राज्यातील शेतकरी, आदिवासींचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढला. या लॉंग मार्च मुळे ते देशभर चर्चेत आले. अनवानी मुंबईला गेलेले गरीब शेतमजूर, शेतकरी व आदिवासींच्या मार्चने सरकारलाही धडकी भरली होती. मात्र अत्यंत शातंतेत व चोखपणे त्याचे नियोजन करुन तो यशस्वी करण्याचे श्रेय किसान सभेचे सचिव व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावीत यांच्याकडेच जाते. विविध प्रश्‍नांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नाही असा एक महिना जात नाही. 

गावीतांचा मोर्चा म्हणजे त्यात प्रचंड गर्दी होणार हे ठरलेलेच असते. त्यामुळे त्यांचे मोर्चे व सामान्य नागरीक व आदिवासींच्या प्रश्‍नावरील संघर्ष सतत चर्चेत असतो. हा प्रयोग त्यांनी अगदी निवडणूकीच्या प्रचारातही यशस्वी करुन दाखवला. पैशाचा कोणताही बडेजाव न करात किंबहून रुपयाही खर्च न करता त्यांच्यासाठी कार्यकर्ते प्रचार करतात. एखादी किल्ला लढवावा असे ते मतदानकेंद्रावर जागरुक शिपायासारखे काम करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आमदार गावीत यांनी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी केली. तेव्हा वीस हजार आदिवासी मार्च करत गावोगावी त्यांचा प्रचार करीत होते. त्यामुळे त्यांची निवडणूक अन्‌ प्रचार सदैव चर्चेत असतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com