jotiradity shinde vasundhara rajl | Sarkarnama

वसुंधराराजे जेव्हा प्रिय भाच्याची गळा भेट घेतात तेव्हा ...! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

जयपूर : राजकीय घराणेशाही अनेक पक्षात विभागली गेली असली तरी रक्ताची नाती ही कधीही तुटत नाहीत याचा अनुभव आज राजस्थानातीलच नव्हे तर देशाने शिंदे घराण्याकडे पाहून घेतला. भाजपच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि कॉंग्रेसचे युवा नेते आणि वसुंधरा राजेंचे भाचे ज्योतिरादित्य शिंदे जेव्हा समोरासमोरे आले तेव्हा या दोघांनी गळाभेट घेतली. 

जयपूर : राजकीय घराणेशाही अनेक पक्षात विभागली गेली असली तरी रक्ताची नाती ही कधीही तुटत नाहीत याचा अनुभव आज राजस्थानातीलच नव्हे तर देशाने शिंदे घराण्याकडे पाहून घेतला. भाजपच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि कॉंग्रेसचे युवा नेते आणि वसुंधरा राजेंचे भाचे ज्योतिरादित्य शिंदे जेव्हा समोरासमोरे आले तेव्हा या दोघांनी गळाभेट घेतली. 

हा प्रसंग पाहून उपस्थित थक्क झाले. आपल्या भाच्याला आर्शिवाद देताना त्या म्हणाल्या, की तुला राजकीय भविष्य आहे. माझा आर्शिवाद.'' खरेतर राजेंनी प्रिय भाच्याच्या कानात काय सांगितले हे मात्र समजले नाही. भाजपच्या दिवंगत नेत्या विजयाराजे शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपसारख्या पक्षासाठी खर्च केले.

त्यांच्या दोन्ही मुली म्हणजेच वसुंधराराजे आणि यशोधराराजे या नेहमीच आईच्या वाटेवर चालल्या. मात्र विजयाराजेंचे पूत्र माधवराव शिंदे यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण केले मात्र ते भाजपत कधी गेले नाहीत. ते कॉंग्रेसमध्येच रमले. माधवराव, वसुंधराराजे, यशोधरा राजे आणि अन्य दोन बहिनी. म्हणजे ही पाच भावंडे. 

शिंदे घराणे दोन पक्षात विभागले गेले त्याला आता बरीत वर्षे उलटली आहेत. या घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आहे. माधवराव शिंदे यांचे पूत्र आणि कॉंग्रेसचे नेते असलेले ज्योतिरादित्य हे ही वडिलांप्रमाणे कॉंग्रेसमध्येच रमले. आज तर ते राहुल गांधीचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. 

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपचा पराभव झाला. मध्यप्रदेशात तर ज्योतिरादित्य प्रचारात सर्वाधिक आघाडीवर होते. कमलनाथ यांच्या सभेपेक्षा त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत होती. खरेतर विजयात त्यांचा सिंहाचा वाटा. ज्योतिरादित्यच मुख्यमंत्री होतील अशी देशवासियांचीच इच्छा होती. मात्र कॉंग्रेसची काही गणिते होती आणि त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे पडले आणि कमलनाथ मुख्यमंत्री बनले. 

ज्योतिरादित्य मुख्यमंत्री न बनल्याने त्यांचे देशभरातील चाहते नाराज झाले. ही नाराजी आज आत्याबाई वसुंधराराजे यांच्या चेहऱ्यावरही लपून राहिली नाही. 
आपल्या प्रिय भावाचा मुलगा मुख्यमंत्री बनला असता तर ? असा प्रश्‍न त्यांच्याही मनाला पडला असेल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शपथविधि समारंभास राहुल गांधी यांच्या सोबत आलेले ज्योतिरादित्य जेव्हा व्यासपिठावर गेले तेव्हा तेथे आत्यांना सामोर गेले. तेव्हा त्यांना राहवले नाही. आपल्या भाच्याची गळा भेट घेत कानात काही तरी सांगितले आणि भावी राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. 

या दोघांचे बोलणे सुरू असताना राहुल गांधीही तेथे आले. तिघेही चर्चेत रमले. वसुंधराराजेंनी भाच्याची घेतलेली गळाभेट मात्र दिवसभर चर्चेचा विषय ठरली. 
 

संबंधित लेख