"दबंग' ज्योती प्रिया सिंह आता अतिरेक्‍यांनाही फोडणार घाम !

भारतामध्ये दहशतवादी हल्ले करून अशांतता निर्माण करण्याचे काम दहशतवादी करत आहेत. त्या दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदुन काढण्याचे काम करण्याची माझी इच्छा होती. त्यादृष्टीने आता "जैश ए मोहम्मद' किंवा त्याच्यासारख्या अन्य दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांची चौकशी, त्यांचा तपास करण्याची संधी मला मिळाली आहे, माझ्यासाठी हे मोठे आव्हान असून ही संधी मला सोडायची नाही. - ज्योती प्रिया सिंह
"दबंग' ज्योती प्रिया सिंह आता अतिरेक्‍यांनाही फोडणार घाम !

पुणे : कुप्रसिद्ध गुंड, दरोडेखोर, रोडरोमीओंपासून ते अगदी एखाद्या कायद्याविरुद्ध वागणाऱ्या एखाद्या कसलेल्या लोकप्रतिनिधीवरही कारवाईचा बडगा उगारून त्यांना तुरूंगात पाठविणाऱ्या "दबंग' अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची खास ओळख. तब्बल सहा फुट उंची, कणखर आवाज आणि तितक्‍याच भारदस्त व्यक्तीमत्वाद्वारे समोरच्या गुंडांना घाम खुटला नसेल तर नवलच. "छोट्या मोठ्या गुंडांना, रोडरोमीओंना धडा शिकविला, आता मला दहशतवाद्यांना धडा शिकवायचाय' अशी जबरदस्त इच्छाशक्ती बोलून दाखविणाऱ्या सिंह यांची राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (एनआयए) पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे "एनआयए' सारख्या देशपातळीवरील तपास संस्थेमध्ये असलेल्या मोजक्‍या महिलांमध्ये सिंह यांचा समावेश झाला आहे. 

पुलवामा येथील दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकीस्तान या दोन देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी ज्योती प्रिया सिंह यांच्यासारख्या "दबंग' महिला अधिकाऱ्याची "एनआयए'मध्ये प्रतिनियुक्ती होणे हे अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरण्याची शक्‍यता आहे. रिसर्च ऍन्ड ऍनालिसीस विंग (रॉ), इनवेस्टीगेशन ब्युरो (आयबी) यांसारख्या महत्वाच्या तपास व गुप्तचर संस्थांची शिखर संस्था म्हणून "एनआयए'ची खास ओळख आहे. दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आणि एकूणच देशाची सुरक्षितता अबाधीत ठेवण्याची जबाबदारी संबंधीत संस्थेवर आहे. याच "एनआयए' मध्ये दोन ते तीन महिला अधिकारी सध्या कार्यरत असून त्यामध्ये आता सिंह यांचा समावेश झाला आहे. 

महाराष्ट्रातील जालना, नगर, कोल्हापुर यांसारख्या शहरांमध्ये पोलिस अधिक्षक म्हणून काम करताना सिंह यांनी स्थानिक गुंडगिरी, राजकीय गुन्हेगारी, महिला-मुलींच्या छेडछाडीविरुद्ध रोडरोमीओंना धडा शिकविण्यापासून कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली. पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या परदेशी नागरीक नोंदणी (एफआरओ) विभागात त्यांनी सुसूत्रता आणली. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला, डीएसके आर्थिक घोटाळा, बीटकॉईन घोटाळ्यासारख्या मोठ्या प्रकरणांच्या तपासाला गती दिली. विशेषतः राजस्थान निवडणुकीत निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 

पोलिस दल असो किंवा कोणतेही क्षेत्र काही वर्ष तुम्ही एकाच ठिकाणी काम केले, तर तुमचा वैयक्तिक विकास होत नाही. कामामध्ये सातत्याने नाविन्य शोधले पाहीजे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते, असा सिंह यांचा विचार आहे. "एनआयए'मुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदुन काढण्याची, त्यांची चौकशी करण्याची संधी मिळणार असल्यामुळे सिंह यांना त्याचा वेगळाच आनंद झाला आहे. या कामासाठी आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 
ही संधी मला सोडायची नाही - ज्योती प्रिया सिंह 
भारतामध्ये दहशतवादी हल्ले करून अशांतता निर्माण करण्याचे काम दहशतवादी करत आहेत. त्या दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदुन काढण्याचे काम करण्याची माझी इच्छा होती. त्यादृष्टीने आता "जैश ए मोहम्मद' किंवा त्याच्यासारख्या अन्य दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांची चौकशी, त्यांचा तपास करण्याची संधी मला मिळाली आहे, माझ्यासाठी हे मोठे आव्हान असून ही संधी मला सोडायची नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com