शिरुरमध्ये शिवसेनेला धक्का : शाखाप्रमुखच राष्ट्रवादीत..

शिवसेना-भाजपा युती जाहीर होवून लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू होण्याच्या बेतात असतानाच शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेला धक्का देत माजी सभापती प्रकाश पवार यांनी जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील शाखाप्रमुख हमीद पठाण याचेसह महत्वाच्या तीन जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
शिरुरमध्ये शिवसेनेला धक्का : शाखाप्रमुखच राष्ट्रवादीत..

शिक्रापूर : शिवसेना-भाजपा युती जाहीर होवून लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू होण्याच्या बेतात असतानाच शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेला धक्का देत माजी सभापती प्रकाश पवार यांनी जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील शाखाप्रमुख हमीद पठाण याचेसह महत्वाच्या तीन जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघ यावर्षी राष्ट्रवादीने प्रचंड ताकदीने लढण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता सर्वच पदाधिकारी आवर्जून व्यक्त करीत असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुनही तसेच संकेत आहेत. याच पार्श्वभूमिवर वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटात शिवसेनेला पहिला धक्का दिला असून जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील शाखाप्रमुख हमीद पठाण, दादासाहेब पवार, यश पवार या शिवसेनेच्या स्थानिक महत्वाच्या शिवसैनिकांना राष्ट्रवादीत खेचत शिवसेनेला नुकताच धक्का दिला.

दरम्यान या तिघांचाही पक्षप्रवेश वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन झाला. यावेळी माजी सभापती प्रकाश पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांचे समवेत सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार, शिरुर बाजार समिती संचालक शंकर जांभळकर, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उद्योगपती सदाशिवअण्णा पवार, युवक अध्यक्ष अमोल जगताप, सुरेश पलांडे, हौसिराम खळदकर, विकास मासळकर, नागेश खळदकर व ग्रामस्थ उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com