joke by girish mahajan | Sarkarnama

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा पाणीदार विनोद

उमेश घोंगडे
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे : राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी आपली तब्येत जशी सांभाळली, तिला आकार दिला आहे, तितका वेळ देऊन पुण्यासह राज्यातील कालव्यांचे सौंदर्यही वाढवावे, असा टोमणा मारत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट-पाटील यांनी कालवा फुटण्याच्या घटनेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जबाबदार धरले. पुणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला देणाऱ्या महाजनांनी एकदा तरी कालव्याची पाहणी केली का, असा प्रश्‍नही दांगटांनी महाजनांना विचारला आहे. 

उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचा महाजनांचा खुलासा विनोदच असून, खरे कारण जाणून घ्यायचे असेल आणि उपाययोजना करायच्या असतील, तर महाजनांनी पायी फिरून कालव्याची पाहणी करावी. तेव्हाच त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा "उद्योग' दिसून येईल, असे आवाहनही दांगट यांनी केले आहे.
 
खडकवासल्यापासून वाहणारा मुठा उजवा कलवा फुटल्याने कालव्यालगतच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालव्याला ठिकाणी भलीमोठी भगदाडे पडल्याने तो फुटण्याची शक्‍यता वाढली आहे. या घटनेवरून राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही विरोधकांनी पाटबंधारे खात्याला लक्ष केले. वडगाव आणि धायरीतून कालवा वाहतो, तेथे मोठी लोकवस्ती आहे. या पार्श्‍वभूमीवर दांगट आणि माजी नगरसेवक अक्रुर कुदळे यांच्यासह स्थानिक लोकांनी कालव्याची पाहणी केली. त्यानुसार आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबबंधित यंत्रणांना पत्र दिले. दांगट आणि कुदळे यांनी सायंकाळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
 
दांगट-पाटील म्हणाले, "" कालव्याची खोली कमी झाली असून, त्याची रुंदी मात्र वाढली आहे. त्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. तो कधीही फुटू शकतो. त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सातत्याने पत्र व्यवहार केला आहे. मात्र, पाटबंधारे खाते आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्‍यात आहे. तरीही, पाटबंधारे खाते लक्ष देत नाही. 
 
संबंधित लेख