पाकिस्तानात अत्याचाराचे खटले दोन महिन्यात निकाली, मग आपल्याकडे उशीर का ?- जोगेंद्र कवाडे ------
औरंगाबाद : महिला, मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण राज्यात वाढत आहेत. आरोपींना वेळेवर शिक्षा होत नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होतांना दिसते आहे. पाकिस्तान सारख्या छोट्याश्या देशात महिलांवरील अत्याचाराच्या खटल्याचा निकाल दोन महिन्यात लागतो, आपल्या देशाची तर जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असतांना आपल्याकडे मात्र खटले वर्षानुवर्षे प्रलंबित कसे राहतात असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी औरंगाबादेत केला.

हनुमंतखेडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या बंजारा समाजाच्या आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शवल्यानंतर जोगेंद्र कवाडे पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणात पोस्टमार्टम, डीएनए अहवालासह सबळ पुरावे हाती असतांना सहा महिने उलटून गेले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होत नाही ही अत्यंत दुदैवी बाब आहे. अत्याचाराची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला होता. त्यासाठी सहा फास्ट ट्रक कोर्ट सुरु करण्यात येणार होती, पण या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार हा खरा प्रश्न आहे.
मुख्यमंत्र्याचे नागपूरच सुरक्षित नाही
राज्याचे गृहमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे. या शिवाय शहर व ग्रामीण भागासाठी दोन गृहराज्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच सर्वाधिक गुन्हे घडतांना दिसत आहेत. जिथे मुख्यमंत्र्यांचे शहरच सुरक्षित नाही, तिथे राज्याचे काय? अशा शब्दांत कवाडे यांनी टीका केली. देशभक्त किंवा एखाद्या व्यक्तीची देशभक्ती ठरवण्यापेक्षा राज्यातील कायदा व सुव्यवस्था महत्वाची आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या धोरणाला विरोध केला म्हणजे, तो देशद्रोह ठरत नाही असा टोला देखील जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी लगावला.