job news dr. suresh mane | Sarkarnama

 नोकऱ्या निर्माण न करने हे देशविरोधी कृत्य : डॉ. सुरेश माने 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई : वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणारे पंतप्रधान मोदी यांनी 10 लाखही नवीन नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत. नोटाबंदीनंतर देशातील लघुउद्योगातील लाखो लोकांचे रोजगार गेले, अनेक उद्योग बंद पडले, यामुळे असलेल्या लघुउद्योगांना वाचविण्यासाठी मोदी सरकारने काही एक केले नाही, उलट त्यांचे नवीन नोकऱ्या निर्माण न करण्याचे धोरण हे देश विरोधी आहे अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला. 

सरकारच्या भांडवलदार समर्थक व जनविरोधी धोरणांमुळे 2014 च्या तुलनेत 60 टक्के नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर गेल्या साडेतीन वर्षाच्या केंद्रातील व विविध राज्यातील भाजप सरकारांच्या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील जनतेला व युवकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. जीएसटीमुळे उद्धवस्त छोटे उद्योजक त्यांची कारखानदारी धोक्‍यात आली, त्यामुळे वाढत्या बेकारीला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्याप्रमाणे सुशिक्षित बेकारांचे भविष्यही अंधकारमय बनले आहे असे डॉ. माने म्हणाले. 

सरकारला आर्थिक, सर्वसमावेशक समतोल विकास साधता येत नसल्याने आरक्षण धोरणे ही गरीबी निर्मुलन कार्यक्रमाप्रमाणे राबविणे हे सर्वथा अयोग्य होय, असेहीते म्हणाले. 

संबंधित लेख