जितेंद्र आव्हाडांना आडनाव बदलायचंय...कुलकर्णी नाव लावायचं म्हणतायत...!!

डोंबवली येथील भाजप कार्यकर्ता कुलकर्णी याला पोलिस कोठडी न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाडांना आडनाव बदलायचंय...कुलकर्णी नाव लावायचं म्हणतायत...!!

पुणे : मला माझे आडनाव बदलायचे आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वाटू लागले आहे. आव्हाड आडनाव बदलून कुलकर्णी हे नाव घ्यावे, असे त्यांच्या मनाने घेतले आहे.

त्याला कारणही तसेच घडले आहे. डोंबिवली येथील भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांनी त्याला अटकही केली होती. मात्र पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर धनंजय कुलकर्णी याला पोलिस कोठडी मागितली नसल्याचा आऱोप आव्हाड यांनी केला आहे. 

``भारतातल्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी आणि धाडसी निर्णय. आर्म्स ऍक्टला १४ दिवस पोलिस कस्टडी मिळाली नाही, असे भारतात एकही उदाहरण नाही. पण न्यायाधीश श्रीनिवास कुलकर्णी यांनी धनंजय कुलकर्णी यांना आर्म्स ॲक्टला जामीन देउन न्यायप्रकियेमध्ये धाडसी निर्णय दिला, `` असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

``ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. मी स्वतःच आडनाव बदलावण्याचा निर्णय घेतो आहे. कुलकर्णी आडनाव लावले की पोलीस मागे लागणार नाहीत.  मेरा महाराष्ट्र बदल रहा है,असे ट्विट त्यांनी केले आहे.


नशिब कुलकर्णीच्या दुकानात शस्रसाठा सापडलायं. कुलकर्णा ऐवजी “कुरेशी” अडनाव असतं तर अख्खा भक्त मिडीया 26 जानेवारीला घातपाताचा मोठा ‘कट’ उघड....! असं तोंड फुटेपर्यंत बोंबलला असता...!, अशीही प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.

त्यांच्या या विधानावर सोशल मिडियात वादंग सुरू झाला आहे. नेटकऱ्यांनी त्यांना विविध आडनावे सुचविली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com