Jitendra Avhad targers ad Prakash Ambedkar | Sarkarnama

आंबेडकर अशात सनातन्यांविरुद्ध बोलताहेत, मी फार आधीपासून बोलतोय : जितेंद्र आव्हाड

सरकारनामा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

.

मुंबई :  "ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बदनामी करू नये. आंबेडकर अशात सनातन्यांविरुद्ध बोलताहेत, मी फार आधीपासून बोलतोय,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

श्री. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा परिवर्तनवादी आणि पुरोगामी पक्ष असून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन निघालेला पक्ष आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याविरोधी अशी विधाने करू नयेत.''

ठाण्याच्या गडकरी रंगायतनात बॉम्बस्फोट झाले तेव्हा हे सनातन्यांचे काम आहे, असे आपण म्हणालो होतो याची आठवण करून देत आव्हाड पुढे म्हणाले, " सनातनच्या आठवलेंच्या अटकेची मागणी मीच केली होती. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर विधानसभेत हे सनातन्यांचे काम आहे, असा आवाज मीच उठवला होता. त्यामुळे सनातन्यांच्या हिटलिस्टवर मी आहे याची जाणीव ऍड. प्रकाश आंबेडकरांनी ठेवावी.''

 

संबंधित लेख