jitendra avhad and dheeraj ghate accuse each other | Sarkarnama

अंदुरे अटकेवरून जितेंद्र आव्हाड व भाजप नगरसेवक धीरज घाटे आमनेसामने

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी पकडलेला सचिन अंदुरे याचे पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने घाटे यांनी त्यांच्याविरोधात सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी पकडलेला सचिन अंदुरे याचे पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने घाटे यांनी त्यांच्याविरोधात सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

अंदुरे याला दाभोलकर खून प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. अंधुरे याने त्याच्या फेसबुकवर आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर खालच्या पातळीवर लिखाण केले होते. वैभव राऊत आणि अंधुरे यांना अटक केल्यानंतर हिंदुत्ववाद्यांविषयी आव्हाड हे सोशल मिडियाल टिप्पणी करत आहेत. अशीच एक वादग्रस्त टिप्पणी त्यांनी घाटे यांच्याबद्दल केली आहे. 

आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार फर्ग्युसन कॉलेजमध्ये तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर हल्ला झाला होता. यावेळी अंदुरे हा धीरज घाटेंसोबत उपस्थित होता. असा आरोप आव्हाड यांनी केल्याने घाटे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांचा आरोप म्हणजे जोक ऑफ द मिलेनियम, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. घाटे हे एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच आव्हाड यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे जाहीर केले.

 

"जेएनयू'मध्ये कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्यांवरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांत आव्हाड यांनी मार्च 2015 मध्ये आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला उत्तर भाजप, भाजयुमोचे कार्यकर्ते उतरले होते. तेथे घाटे उपस्थित होते. "या आंदोलनात मी पुढे होतो. तसेच आव्हाड यांच्या काही चुकीच्या गोष्टींबद्दल मी ब्लॉगद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले होते. ते डोक्‍यात ठेवून आव्हाड यांनी असे चुकीचे आरोप केले आहेत. अंदुरे आणि माझा काही संबंध नाही. त्याला मी ओळखत नाही. तेव्हा झालेल्या आंदोलनाचे सीसीटिव्ही फूटेज पाहून याबाबत खात्री पटू शकेल, असे घाटे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख