jitendra avad assembly speech | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

पेटणाऱ्या महाराष्ट्रात तुमचीही खांडोळी होईल, आव्हाडांनी सरकारवर डागली तोफ 

ब्रह्मा चट्टे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : भीमा कोरेगावप्रकरणी राज्यातील दोन समाज एकमेकांसमोर भिडले होते, तेंव्हा सरकार काय करत होते ? पेटणाऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमचीही खांडोळी होईल हे लक्षात घ्या. खर्डा हत्याकाडांमध्ये साक्षिदार फिरले. सरकारने यावर काय केले ? असा सवाल विचारत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरले. 

मुंबई : भीमा कोरेगावप्रकरणी राज्यातील दोन समाज एकमेकांसमोर भिडले होते, तेंव्हा सरकार काय करत होते ? पेटणाऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमचीही खांडोळी होईल हे लक्षात घ्या. खर्डा हत्याकाडांमध्ये साक्षिदार फिरले. सरकारने यावर काय केले ? असा सवाल विचारत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरले. 

राज्यपालांचा अभिभाषणानंतर विधानसभेत झालेल्या चर्चेत सहभाग घेताना ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, "" शेतकरी जगला तर देश जगेल. या व्यवस्थेला शेतकऱ्यांनी जगवलं आहे. मात्र, शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजनांचा साधा उल्लेखही राज्यपालांनी त्यांच्या भाषणात केला नाही. याचा निषेध नोंदवायला मी उभा रहिलो आहे. 
आपल्या मतदारांना स्वस्तात माल मिळावा म्हणून उत्पादकांचे बळी देवू नका. उत्पादक शेतकरी मोडून पडला तर या देशाची व्यवस्था मोडून पडेल याची दखल आपण घ्यायला हवी. शेतकरी कामगारांच्या पोरांच्या शिक्षणाच्या जीवावर हे सरकार उठले आहे. समाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणाऱ्यांना सरकारकडे नोंदणी आवश्‍यक करणं, त्यांना अधिभार, आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा या सरकारने आणला आहे. तो हाणून पाडावा लागले. 

"अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या साहित्य रत्नाचे वारसदार आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.ज्यांच्या पोवाड्याने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन महाराष्ट्रात पेटले त्याच अण्णा भाऊंच्या वारसची राज्य सरकार उपेक्षा करत आहे. साधी त्यांची भेटही घ्यावी असे सरकारला वाटत नाही. हे सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करते पण, करत काहीच नाही. महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी सरकारने दहा एकर जमीन देण्याची घोषणा केली मात्र, त्याबाबत कसलीच हलचाल केली नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. 

संबंधित लेख