Jitenda Awhad upset over rich & young leaders | Sarkarnama

आव्हाड मोठ्या घरच्या मुलांना म्हणतात, क्या घंटा लेके जायेगा !

सरकारनामा
मंगळवार, 12 मार्च 2019

मुंबई :   सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गिरीश महाजन भेटीमुळे जितेंद्र आव्हाड कमालीचे अस्वस्थ झाले आहेत . त्यांनी मोठ्या घरची पोर नावाने एक कविताच केली असून त्यामध्ये राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या मुलांना झोडपून काढले आहे . आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड लिहितात ,

निष्ठा 
भक्ती 
श्रद्धा 
विचारधारा 
मोठ्या घरची पोर
भरलेल्या ताटातील लोणच्या सारखे तोंडाला लावतात 
रातोरात गांधींच्या मांडी वरून उठून
गोडसें च्या मिठीत विसावतात 
.
.
आपण मात्र जिंदाबाद मुर्दाबाद चे नारे मना पासून लावू या आणि म्हणू या 
.
.
नंगा ही तो आया था क्या घंटा लेके जायेगा

याशिवाय  महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुपारी एका  उपरोधात्मक ट्विटमध्ये केली आहे . शिवाय ही सूचना जनहितार्थ जारी केली आहे असेही ते म्हणतात . 

संबंधित लेख