jaysinghrao pawar about mard maratha | Sarkarnama

घोषणा बदलून अशी करा, 'एक मराठा-मर्द मराठा'! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

'एक मराठा-लाख मराठा, अशा घोषणेऐवजी आता 'एक मराठा-मर्द मराठा' अशी घोषणा व्हायला हवी, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्‍त केले. 

कोल्हापूर : 'एक मराठा-लाख मराठा, अशा घोषणेऐवजी आता 'एक मराठा-मर्द मराठा' अशी घोषणा व्हायला हवी, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्‍त केले. 

दसरा चौकातील मराठा आंदोलनात बोलताना डॉ. पवार म्हणाले, पारतंत्र्यात असताना आपण अनेक पराक्रम केले. मोगलांना, ब्रिटीशांना मराठी बाणा दाखवला. मग, आता स्वातंत्र्यात आपला हक्क मागताना आत्महत्या कशासाठी करायच्या? हा मार्ग अत्यंत चुकीचा असून समाजातील तरूणाईने तो अजिबात पत्करू नये.'' मराठा समाज शांतताप्रिय आणि संयमी आहे. मात्र, शांततामय मार्गाने काढलेल्या मोर्चातून सरकारने गैरसमजूत करून घेतली. पुढे कुठलीच सकारात्मक कार्यवाही न झाल्याने आता समाज पेटून उठला आहे. मात्र, तरीही कोल्हापुरातील आंदोलन सनदशीर मार्गानेच सुरू ठेवल्याचा अभिमान असल्याचेही डॉ. पवार म्हणाले. 

संबंधित लेख