Jayprakash Mundada - birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार, शिवसेना, वसमत, जि. हिंगोली.

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

शिवसेनेचे मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ आमदार म्हणून डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे

शिवसेनेचे मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ आमदार म्हणून डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे. मागील युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे सहकारमंत्री हे महत्वाचे पद देण्यात आले होते. गेल्या तीस वर्षांपासून वसमत विधानसभा मतदारसंघात त्यांचा कायम दबदबा आहे. सहकारमंत्रिपद भूषविल्यानंतर मागील वेळेस त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. २०१४ मध्ये ते वसमत विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दांडगा जनसंपर्क आणि सतत खेड्यात प्रवास करत लोकांच्या कामात आणि संपर्कात कायम राहून त्‍यांनी त्‍यांचे स्‍थान कायम केले आहे. 

टॅग्स

संबंधित लेख