jaykumar gore criticise ramraje naik nimbalkar | Sarkarnama

आमच्या गोरे घराण्यात आग लावून शेकत बसलेला इसम म्हणजे रामराजे!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 डिसेंबर 2018

संपूर्ण जिल्हा अशांत गेल्या दोन चार वर्षांपासून त्याला कारणही रामराजे नाईक निंबाळकर हाच इसम आहे.

सातारा : आमच्या घरापासून अनेक घराण्यांमध्ये तेल ओतून आग लावायची आणि शेकत बसायचे काम रामराजेंनी केले आहे. संपूर्ण जिल्हा अशांत आहे, त्याला कारणही रामराजे नाईक निंबाळकर हेच आहेत, असा आरोप माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज केला. 

साताऱ्यातील दोन राजांत वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे का, या प्रश्‍नावर गोरे म्हणाले, दोन राजेंना स्वतंत्र मत, विचार असून त्यांची स्वतंत्र राजकिय ताकद ही आहे. मी काय बोलावे. पण आमच्या घरापासून अशी अनेक घराणी आहेत. त्यांच्यात तेल ओतून आग लावायची आणि शेकत बसायचे काम या माणसाने केले आहे. संपूर्ण जिल्हा अशांत गेल्या दोन चार वर्षांपासून त्याला कारणही रामराजे नाईक निंबाळकर हाच इसम आहे.  खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याला अडविण्यासाठी पोलिस यंत्रणा व इतर ताकदीचा वापर करून त्याला राजकारणातून संपविण्याची भुमिका घेणाऱ्या लोकांची संख्या वाढीला लागली आहे.  

संबंधित लेख