मोदींनी शेतकऱ्यांना किमान चहा पिण्यापुरते तरी पैसे द्यायला हवे होते : जयंत पाटील

``मोदीसाहेब, नेहमी चहा विकला असे सांगतात, मग त्यांनी शेतकऱ्यांना किमान दररोज एक कप चहा पिता येईल, एवढेतरी पैसे द्यायला हवे होते. त्यांनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे,'' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कापुसखेड (ता. वाळवा) येथील विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत केला.
मोदींनी शेतकऱ्यांना किमान चहा पिण्यापुरते तरी पैसे द्यायला हवे होते : जयंत पाटील

इस्लामपूर : ``मोदीसाहेब, नेहमी चहा विकला असे सांगतात, मग त्यांनी शेतकऱ्यांना किमान दररोज एक कप चहा पिता येईल, एवढेतरी पैसे द्यायला हवे होते. त्यांनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे,'' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कापुसखेड (ता. वाळवा) येथील विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत केला. 

मोदींसाहेबांनी देशावर ८२ लाख कोटींचा तर फडणवीस सरकारने ५ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला, असेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, "ज्यांनी ५ वर्षात सामान्य जनतेला लुटले ते आता मोठमोठ्या घोषणा करतील, त्यांना फसू नका. मोदींसाहेबांनी देशावर ८२ लाख कोटीचा तर फडणवीस सरकारने ५ लाख कोटी कर्जाचा डोंगर केला. भाजपाने देशात ७० वर्षात काय झाले? अशी ओरड करीत सत्ता मिळविली.''

गेल्या साडेचार-पाच वर्षात मोदी सरकारने काय दिवे लावले? असा प्रश्न करून जयंत पाटील म्हणाले, की ज्या देशात टाचणी बनत नव्हती त्या देशात विमान, रणगाडे बनू लागले. स्व. इंदिरा गांधींनी अणूचाचणी घेतली. पूर्वीचे गव्हर्नर अर्थतज्ञ होते; मात्र आता मोदींसाहेबांनी आणलेले गव्हर्नर हे इतिहासाचे पदवीधर आहेत. मोदींसाहेबांनी रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील सव्वा तीनलाखकोटी मागितल्याने त्यांनीच आणलेले उर्जित पटेलांनी राजीनामा दिला. त्यांचा सीबीआय व न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप लोकशाहीस मारक आहे. झालेल्या विकासकामापेक्षा न झालेल्या विकासकामाची चर्चा होते. आता विकासकामांच्या पलीकडे जावून या देशातील लोकशाही, राज्यघटना टिकविण्यासाठी ताकद द्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com