jayant patil mla raigad | Sarkarnama

आजचा वाढदिवस : जयंत पाटील - आमदार विधानपरिषद, सरचिटणीस शेकाप. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 जुलै 2018

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शेकापची अजूनही पाळेमुळे घट्ट रोवून ठेवली आहेत. पाटील सलग तीन वेळा विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात ही अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून झाली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि 2000 पासून ते आजतागायत विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील बॅंका, विविध कार्यकारी सोसायट्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत यांच्यावर त्याचे वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवणारी बॅंक म्हणून ओळखली जाते.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शेकापची अजूनही पाळेमुळे घट्ट रोवून ठेवली आहेत. पाटील सलग तीन वेळा विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात ही अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून झाली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि 2000 पासून ते आजतागायत विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील बॅंका, विविध कार्यकारी सोसायट्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत यांच्यावर त्याचे वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवणारी बॅंक म्हणून ओळखली जाते. राष्ट्रवादीच्या मदतीने त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना शिक्षक आमदार मतदार संघातून निवडून आणले. उद्योगाच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून नागेश एंटरप्रायझेस, नागेश पब्लिशर्स प्रा. लि. आणि पीएनपी मेरिटाईम सर्व्हिसेस प्रा. लि., सीस्प्रे ऍल्युमिनियम बोट्‌स (इंडिया) प्रा. लि. या ऍल्युमिनिअमच्या बुलेटप्रूफ बोटी बनविणारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या त्यांनी सुरू केल्या आहेत. 

संबंधित लेख