"ढ" लोकांच्या भरोश्‍यावर राज्याचा कारभार : जयंत पाटील 

"ढ" लोकांच्या भरोश्‍यावर राज्याचा कारभार : जयंत पाटील 

मुंबई : बोगस उमेदवार बसवून एमपीएससीच्या परीक्षा पास होवून अनेकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. तशा "ढ" लोकांच्या भरोश्‍यावर राज्याचा कारभार सुरू आहे. त्या सगळ्यांची हाकलपट्टी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील विधानसभेत केली. 

एमपीएससीच्या बोगस भरती प्रकरणी विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. 

े जयंत पाटील यांनी या मुद्यावर स्थगन प्रस्ताव दाखल केला. तो स्थगनचा विषय होत नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरत गोंधळ घातला. ' एमपीएससीचा घोटाळा करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार, नही चलगे नही चलगे दादागिरी नही चलेगा, पकोडा बाज सरकारचा धिक्कार असो'', अशा घोषणा दिल्या. 
लाखो विद्यार्थ्यांच्या संबंधीत गंभीर प्रश्न आहे. यासंबंधी सत्यता काय आहे हे कळू द्या. सरकार कोणाला पाठिशी घालत आहे ? बोगस लोकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. राज्यात दहा हजार बोगस आधिकारी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्थगन प्रस्तावावर स्वीकारण्यात यावी अशी मागणी विखे पाटील यांनी लावून धरले. 

या मागणीवर बागडे यांनी सांगितले की, " हा विषय इतका गंभीर आहे तर त्यावर नियम 293 अन्वये, तुम्ही प्रस्ताव दाखल करा. हा स्थगनचा विषय होत नाही. त्यामुळे मी स्थगन प्रस्ताव नाकारतो." ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com