नरेंद्र मोदींच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवस्मारकांची उंची कमी केली : जयंत पाटील

नरेंद्र मोदींच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवस्मारकांची उंची कमी केली : जयंत पाटील

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वांत उंच पुतळा उभारला. या पुतळ्याच्या माध्यमातून आपले नाव अजरामर ठेवण्यासाठी मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कानउघाडणी करीत शिवस्मारकात उभारण्यात येत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मुर्तीची उंची करण्याचे सांगितले. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या मुर्तिची उंची कमी केल्याचा आरोप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे, जिल्हा प्रभरी बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे, प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. आशा मिरगे, माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, की मी शिवाजी महाराज स्मारक समितीचा अध्यक्ष असतांना आम्ही पुतळ्याचे चित्र तयार केले होते. 182 मिटर पेक्षा उंच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होतो. 
शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या टोकातून मुंबईचे निरिक्षण करता येईल, अशी व्यवस्था आम्ही करणार होतो. मात्र, वल्लभभाई पटेल यांच्या पेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा नसावा आणि मोदींचे नाव शेवटपर्यंत अजरामर राहावे म्हणूनच मोदींनी टाकलेल्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची पुतळ्याच्या मुर्तीची उंची कमी केली. मात्र, महाराष्ट्रात सहा महिन्यांनी आमचे सरकार सत्तेवर येणार आहे. सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मुळ डिझाईननुसार स्मारक बनविणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ सरकारनेही श्रीरामाची भव्य मुर्ती उभारण्याची तयारी केली. मात्र, तेथेही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकापेक्षा श्रीरामाच्या मुर्तीची उंची वाढणार नाही, अशी व्यवस्था मोदी सरकार करीत असल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. 
राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळत असून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचीत ठेवले आहे. आता दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळतही शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न असून हिवाळी अधिवेशनात त्यावर सरकारला धारेवर धरणार असल्याचे पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com