jayant patil and bjp | Sarkarnama

नगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतला - जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : जातीयवादी पक्षांसोबत जायचे नाही अशीच आमची भूमिका आहे, स्थानिक पातळीवर घेतला गेलेला हा निर्णय आहे, प्रलोभनाला बळी पडून किंवा अन्य काही कारणासाठी व्यक्तिगत पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिथल्या नगरसेवकांनी हा निर्णय घेतलाय, आम्ही या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर सक्त कारवाई करू अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 

नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडला गेला आहे. मात्र ही दुर्देवाची बाब असून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्‍नच नाही असे पाटील म्हणाले. आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 
 
संबंधित लेख