jayant patil about sena-bjp yuti | Sarkarnama

उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे घडेल, युती खड्यात जाईल!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सध्या जे नाटक सुरू आहे त्यातून शिवसेना आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

चिपळूण (रत्नागिरी):  साडेचार वर्षात शिवसेना - भाजपचे नेते आणि मंत्र्यांनी एकमेकांचे कपडे उतरविले, भ्रष्टाचाराचे आरोप केले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. असे असताना युती झाली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे युती खड्यात जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणूकीत शिवसेना - भाजपची युती होणार. हिमत असेल तर शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून दाखवावी. पण शिवसेना तसे करणार नाही. सध्या जे नाटक सुरू आहे त्यातून शिवसेना आपले महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सेना, भाजप खोटे बोलून आणि नागरिकांची दिशाभूल करून सत्तेवर आले. सरकारचा खोटारडेपणा नागरिकांच्या लक्षात आला आहे. पराभूत मानसिकतेतून खोटी आश्‍वासने दिली जात आहेत. 50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असे भाजपचेच नेते सांगत होते. आता निवडणूक जवळ आल्यामुळे नागरिकांना खूश करण्यासाठी आरक्षणाचे गाजर दाखविले जात आहे. साडेचार वर्ष तुमच्या हातात होते तेव्हा तुम्ही आरक्षण का दिले नाही. आम्ही कोणत्याही आरक्षणाचा विरोधात नाही. सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख