jayant patil | Sarkarnama

"जलयुक्त'ची पहाणी मुख्यमंत्री करतात मग राम शिंदे काय करतात ? - जयंत पाटील

ब्रह्मा चट्टे
रविवार, 21 मे 2017

मुंबई : लोकसहभागातून केल्या जाणाऱ्या कामाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री करतात त्याला जलयुक्त योजनेचे नाव देतात. जलयुक्तच्या कामाची पहाणी मुख्यमंत्री करतात मग जलसंधारण मंत्री राम शिंदे काय करतात ? असा खडा सवाल जयंत पाटील यांनी केला. जलयुक्तच्या कामावर जीएसटी लागू होणार का असा प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच चिमटे काढले. 

विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित केलेल्या अधिवेशनात विधानसभेत जयंत पाटील बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, " हे सरकार ट्विट्टवरच चालते. त्यामुळे जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर पंकजाताई यांनी ट्विट्टरवर नाराजी व्यक्त केली होती. तर ज्यांच्याकडे हे खाते आले ते राम शिंदे यांनी पाच दिवस पंकजाताई भारतात परत येई पर्यंत या खात्याचा कारभाराला हातही लावला नाही. किती ही व्यक्तिनिष्ठा म्हणत राम शिंदे यांना जयंत पाटील यांनी चिमटे काढले. 

मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम वाचून दाखवत जयंत पाटील म्हणाले, "राज्याचे प्रमुख जलयुक्तच्या गाळाची पाहणी दिवसातून तीन तीनवेळा करतात. मग जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काय करावे ? ते नेमकं काय करतात? असा प्रश्न पाटील यांनी विचारला. जयंत पाटील यांनी जलयुक्त योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपाचा दाखला दिला. मंत्री मंडळातील दोन "रामां'मध्ये "राम" नसल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

संबंधित लेख