मी संजय कुटे, शपथ घेतो की म्हणताच... 'जय गजानन' चा नामघोष!

मी संजय कुटे, शपथ घेतो की म्हणताच... 'जय गजानन' चा नामघोष!

संग्रामपूर : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी जाहीर होताच राजभवन `संत गजानन महाराज की जय` चा जयघोषाने दुमदुमले.

राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात जळगाव जा मतदारसंघाला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. आमदार डाँ संजय कुटे यांनी 16 जून रोजी कॅबिनेट च्या शपथविधी  साठी मंचावर प्रवेश करताच उपस्थित त्याच्या चाहत्यांनी राजभवन परिसरात राज्याचे आराध्य मानले जाणारे संत गजानन महाराज्यांच्या नावाचा जयघोष केला. इतकेच नाही तर मतदार संघात ही यावेळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. त् राज्यातील जनतेच्या च्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू व निर्णयक्षमता असलेल्या नेत्यामधील मंत्री म्हणून डॉ. कुटे नक्कीच नावारूपाला येतील.

गेल्या दीड ते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव येताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव जामोद येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन पेढे भरविले. आमदार डॉ. संजय कुटे प्रतिनिधित्व करत असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात विदर्भ पंढरी शेगाव हे श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळेच आमदार कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच गजानन महाराज की जय असा नामघोष करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com