jansangharsha yatra in pimpari chinchwad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसला बळ देऊ शकलो नाही ; दोन माजी मुख्यमंत्र्यांची कबुली

उत्तम कुटे 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

अस्तित्वाची लढाई लढणारी पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस संघर्ष यात्रेमुळे चार्ज झालेली आढळली.

पिंपरीः एकही नगरसेवक, आमदार, खासदार नसल्याने अस्तित्वाची लढाई लढणारी पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस संघर्ष यात्रेमुळे काल (ता.7) चार्ज झालेली आढळली. मात्र, त्याचा फायदा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला होणार आहे. आतापर्यंत आर्थिक व इतर बळाअभावी संघर्ष करीत असलेल्या शहर कॉंग्रेसला या यात्रेने, मात्र भरपूर नैतिक बळ दिल्याचे दिसून आले. 

केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणाविरोधात कोल्हापूरपासून 31 ऑगस्टलासुरु झालेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्याचा समारोप आज पुण्यात होणार आहे. तत्पूर्वी काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये सभा झाली. तिला या यात्रेला हिरवा कंदिल दाखविणारे पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जून खर्गे उपस्थित नव्हते. मात्र, दोन माजी मुख्यमंत्री चव्हाणांनी ती कसर भरून काढली. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण हल्लाबोल केला. तर, अशोक चव्हाण यांनीही भाजपसह पीएम व सीएमवर जोरदार टीका केली. 

पहिल्यांदाच पक्षाचे मोठे नेते शहरात एकत्र एका व्यासपीठावर यानिमित्त आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हुरुप चढल्याचे त्यांची देहबोली सांगत होती. आघाडी होणार असल्याचे सुतोवाचही यावेळी झाले. मात्र, ती सन्मानपूर्वक व्हावी, अशी इच्छाही व्यक्त करण्यात आली. 

दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत शहरातील दोन्ही खासदारकी व तिन्ही आमदारकीच्या जागा राष्ट्रवादीकडे आहेत. शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तसेच ते पक्षाचे नेते अजित पवार यांचे होमटाऊन बारामतीनंतर आवडीचे शहर आहे. गेली 15 वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची निरंकुश सत्ता होती. दुसरीकडे कॉंग्रेसची अवस्था शहरात दिवसागणिक तोळामासा होत चालली आहे. सध्या त्यांचा एकही नगरसेवकही नाही. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली ,तरी शहरातील एकही जागा राष्ट्रवादी ही कॉंग्रेसला सोडणार नाही. त्यामुळे संघर्ष यात्रेमुळे चार्ज झालेल्या कॉंग्रेसला या दोन्ही निवडणुकीत, तरी त्याचा फायदा होण्याची शक्‍यता दिसत नाही. 

आगामी निवडणुकीत शहर कॉंग्रेसला संघर्ष यात्रेचा काहीही फायदा होणार नसला, तरी तिने कॉंग्रेसला मोठे नैतिक बळ मिळाले आहे. प्रदेश कॉंग्रेसकडून कुठलेच बळ मिळत नसल्याने शहराध्यक्ष सचिन साठे व त्यांच्या कार्यकारिणीने आपले राजीनामे दिले होते. त्याच प्रदेश कॉंग्रेसला आज शहर कॉंग्रेसपुढे काहीसे नमते घ्यावे लागले. पिंपरी कॉंग्रेसला ताकद दिली नसल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना द्यावी लागली. तर, सत्तेत असूनही हे बळ देऊ शकलो नसल्याची कबुली दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही द्यावी लागली. 

संबंधित लेख