जानकर बारामतीतून लढणार कपबशी घेऊन 

जानकर बारामतीतून लढणार कपबशी घेऊन 

पुणे : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या राज्यात मंत्री असले तरी त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची दांडगी इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण बारामतीतून लढणार, आणि ते पण कपबशी ही निशाणी घेऊन असा पुनरुच्चार जानकर यांनी आज पुण्यात केला. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून निवडणूक लढवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार टक्कर दिली होती. पराभूत झाले असले तर भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देत कॅबिनेट मंत्री केले होते.

राज्याच्या कारभारात ते मग्न असले तरी आगामी लोकसभा लढण्यासाठी त्यांनी शड्डू ठोकला आहे. आगामी लोकसभा आपण पुन्हा बारामतीतून लढणार आहोत, असे सांगत त्यांनी आपला मनसुबा स्पष्ट केला. ही निवडणूक आपण भारतीय जनता पक्षाचे कमळ नव्हे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com