Jangaon Politics will Khadse get Cabinet again | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भूंकपाच्या प्रतिक्षेत थबकलय जळगावचे राजकारण!

कैलास शिंदे
शुक्रवार, 14 जुलै 2017

जळगाव जिल्हा नेहमीच राजकारणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे राज्यात उमटले आहेत. विधानसभेच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाची फारशी उत्सुकता नसते. परंतु, यावेळी मात्र त्याची खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील राजकारणात प्रतिक्षा आहे.

जळगाव : 'भूकंप' हा शब्द ऐकला तरी पाचावर धारण बसते. तो सांगून येत नाही, अचानक येतो. जळगाव जिल्ह्यात मात्र उलट चित्र आहे. शिवसेनेने राजकीय भूकंपाचे भाकित वर्तविले असून त्याचा केंद्रबिंदूही जळगाव असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपतही राजकीय उलथापालथ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांची मंत्रीमंडळात परतीचे संकेत आहेत. मात्र आता त्यासाठी 25 जुलैची प्रतिक्षा असून जिल्ह्याचे स्थानिक राजकारण मात्र सध्यातरी आहे तिथेच थबकलंय.

जळगाव जिल्हा नेहमीच राजकारणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे राज्यात उमटले आहेत. विधानसभेच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाची फारशी उत्सुकता नसते. परंतु, यावेळी मात्र त्याची खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील राजकारणात प्रतिक्षा आहे. त्याचे कारणही तसेच घडले आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना पाचोरा येथे झालेल्या जाहिर सभेत त्यांनी राज्याच्या राजकारणात 25 जुलैला भूंकप होणार त्यांचा केंद्रबिंदू उत्तरमहाराष्ट्रातील जळगाव जिल्हा असणार असे भाकित वर्तवून खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळात परत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मांत्र झोटींग समितीचा अहवाल विधीमंडळात सरकारने ठेवल्यानंतर त्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळाले असून त्यांचीही तारीख 25 जुलैच आहे. या दोन घटनांची प्रतिक्षा राज्याच्या राजकारणाला तर आहेच. परंतु, जळगाव जिल्ह्यालाही आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आतापासून सुप्त चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेनेचा भूकंप आणि खडसेची मंत्रीमंडळातील पुनरागमन ? यामुळे जिल्ह्यातील राजकारण निश्‍चित बदलणार आहे.

मात्र त्याचे नक्की स्वरुप काय असेल, याचा अंदाजही राजकारण्यांना लागत नाही, अशी आजची स्थिती आहे. भाजपमध्येही खडसे आणि महाजन असे दोन गट आहेत. परंतु, आता हे वादही थांबले आहेत. एवढेच नव्हे आता मनोमिलनाचे वारेही जोरात वाहू लागले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे कट्टर विरोधक एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांनी मेहरूण तलावाच्या पाण्याच्या साक्षीने राऊंड टेबल 'भजी'चर्चा केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुखमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. त्यांची आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यात जान फुंकण्यासाठी एकमेकावर आरोपाचे 'बोळे' फेकले. यापलिकडे त्यांच्या दौऱ्यात फारसे काही साध्य झाल्याचे दिसत नाही. कारण आता त्यांच्या वादापेक्षा जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे लक्ष आता विधीमंडळाच्या 25जुलैच्या अधिवेशनावर आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील स्थानिक राजकारण थंडावले आहे. राजकीय नेतेही म्हणू लागलेत... 25 जुलैनंतर पाहू आता काहीच बोलू नका!

संबंधित लेख