jamkhed council vice presidet post caste politics | Sarkarnama

गेल्यावेळी माळी आता मुस्लीम...जामखेडमध्ये बेरजेचे राजकारण! 

वसंत सानप 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

जामखेड (जि.नगर) : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरीदा आसिफ पठाण यांची बिनविरोध निवड करुन मागील वेळी मुस्लिम समाजातील नगरसेवकास सत्तेत संधी देण्याचा राहून गेलेला राजकीय निर्णय पालकमंत्री राम शिंदे यांनी दुरुस्त केला. तसेच यानिमित्ताने नगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरु झालेली बिनविरोध नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष निवडीची परंपराही कायम ठेवली. 

जामखेड (जि.नगर) : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरीदा आसिफ पठाण यांची बिनविरोध निवड करुन मागील वेळी मुस्लिम समाजातील नगरसेवकास सत्तेत संधी देण्याचा राहून गेलेला राजकीय निर्णय पालकमंत्री राम शिंदे यांनी दुरुस्त केला. तसेच यानिमित्ताने नगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरु झालेली बिनविरोध नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष निवडीची परंपराही कायम ठेवली. 

अडीच वर्षापूर्वी निवडणूकीत भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. तीन नगरसेवक असलेल्या भाजप बरोबर आघाडीतील चौदा नगरसेवकांनी उघड उघड "घरोबा' केला आणि संख्याबळ सतरावर जाऊन पोहचले. त्या बळावर शिंदेंनी भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या पत्नी अर्चना राळेभात यांना नगराध्यक्ष केले तर अपक्ष नगरसेवक महेश निमोणकर यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष केले. 

दरम्यान, अडीच वर्षे संपली. दुसऱ्या टर्ममध्ये नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले. या प्रर्वगातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत. ते दोघेही त्या "चौदा'मधून पालकमंत्री शिंदेंकडे आलेले आहेत. त्या दोघांनाही आपल्यालाच पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून मोठे लॉंबिंग केले. मात्र पालकमंत्र्यांनी होत असलेली रस्सीखेस ओळखली आणि दोघांना समान सव्वा -सव्वा वर्ष संधी देण्याचा निर्णय घेतला. 

पालकमंत्र्यांनी पहिलांदा नगरसेवक निखिल घायतडक यांना संधी देवून त्यांची बिनविरोध निवड केली. आज दुपारी (बुधवार) यासंदर्भात औपचारिकता पूर्ण झाली. याचवेळी उपनगराध्यक्षाची निवडही झाली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक चौदातून निवडून आलेल्या त्या "चौदा' नगरसेवकातील फरीदा आसिफ पठाण यांच्या नावाला हिरवा कंदील देवून उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. सामाजिक समतोलही राखला. 

जामखेड मध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असून, फरीदा पठाण या जामखेडचे माजी उपसरपंच (कै.) आसिफ पठाण यांच्या धर्मपत्नी तर सेवानिवृत्त प्राचार्य आयुबखान पठाण यांच्या पुतनी होत. पठाण कुटुंबाला सामाजिक कार्याबरोबरच व राजकारणाचाही वारसा आहे. शिंदे यांनी माळी समाजातील महेश निमोणकर यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिल्याने मुस्लिम समाजाला ही संधी देता आली नव्हती. यावेळी ती उणीव भरुन काढण्यात पालकमंत्री यशस्वी झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख