Jalindhar Kamte criticizes Sjivtare | Sarkarnama

शिवतारेंचे मुंबईचे पार्सल परत मुंबईला पाठवा : कामठे 

दत्ता भोंगळे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

गराडे : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या गरजेच्या वेळी सोडले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभे पीक, बागा सोडून दिल्या. पुरंदर तालुक्‍यातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. राज्यमंत्री जे बोलतात ते करीत नाहीत. हे मुंबईचे पार्सल आता पुन्हा मुंबईला पाठविण्याची वेळ आली आहे,'' असा टोला पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी लावला. 

सासवड ( ता. पुरंदर ) येथील पंचायत समिती येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी अमित भाऊसाहेब झेंडे (दिवे) यांची व युवक कॉंग्रेसच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी पुष्काराज संजय जाधव (परिंचे) यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष मानसिंग पांचुंदकर पाटील यांनी दिल्या नंतर निवड झालेल्या दोधांचा सत्कार श्री. पांचुंदकर पाटील व श्री. कामठे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. कामठे बोलत होते. 

कामठे म्हणले,""शिवतारे यांनी तालुक्‍यात काहीच कामे केलेले नाहीत. त्यामुळे तालुक्‍याची प्रगती खुंटली आहे. त्यामुळे जनतेत असंतोष आहे. तालुक्‍यातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. त्यांचा संपर्कही कमी झालेला आहे. बोलघेवडेपणा करण्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे. तालुक्‍याकडे त्यांचे लक्षच नाही. ते मुंबईतून थेट येथे आले आणि आमदार झाले. त्यांना खऱ्या समस्यांची माहितीच नाही. त्यामुळे त्यांचे पार्सल पुन्हा मुंबईला पाठवून द्यायची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत जनता तसा निर्णय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.'' 
 
संबंधित लेख