jalil mla aurangabad | Sarkarnama

फिरोजखान यांना आमदार जलील यांच्याकडून घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी दोन दिवसांपुर्वी महापालिकेला मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीवरून राजकीय पक्षांमध्ये चांगलेच महाभारत झाले. एमआयएमचे विरोधी पक्ष नेते फिरोज खान यांनी तर आम्हाला विश्‍वासात का घेतले नाही म्हणत महापौरांचा पुतळाच जाळण्याचा प्रयत्न केला. पण काल पुतळा जाळणारे फिरोज खान व महापौर भगवान घडामोडे एका कार्यक्रमात चक्क मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहून इम्तियाज जलील यांनी फिरोज खान यांना शालजोडीतले टोले लगावत चांगलीच धमाल उडवून दिली. 

शंभर कोटी रुपयांच्या निधीवरून सत्ताधारी सेना-भाजपमध्ये अद्यापही रुसवे-फुगवे सुरु आहेत. एमआयएमने देखील या वादात उडी घेतली होती. पण स्वपक्षातील नगरसेवकांचीच साथ न मिळाल्याने फिरोज खान तोंडघशी पडले होते. त्यातच आमदार इम्तियाज जलील यांनी आज जाहीर कार्यक्रमात फिरोज खान यांची चांगलीच फिरकी घेतली. महापालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते अयुब जहागिरदार यांनी आझाद चौकातील आपल्या घरी रमझान ईद निमित्ताने शिरकुर्म्यांच्या पार्टीचे आयोजन केले होते. भाजपचे आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांच्यासह एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व इतर पदाधिकारी देखील या पार्टीत सहभागी झाले होते. 

कैसे जलाते, हाथ मे सौ करोड जो है.. 
शिरकुर्म्यावर ताव मारण्याआधी इम्तियाज जलील यांनी सुरुवातीलाच आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांचे शहराला शंभर कोटींचा निधी मिळवून 
दिल्याबद्दल अभिनंद केले. पुतळा जाळणारे एमआयएमचे विरोधीपक्ष नेते फिरोज खान व महापौर शेजारीच बसल्याचे पाहून जलील यांनी त्यावर कोटी करण्याची संधी सोडली नाही. " हमारे विरोधी पक्षनेता फिरोजखान ऐसे शक्‍स है जो बिना माचीस के कही भी आग लगा सकते है ' कल उन्होने भगवान घडामोडे साहब का पुतला जलाने की कोशिश की, लेकीन कैसे जलाते. क्‍यु के घडामोडे साहबके हाथ मे सौ करोड है. तो घडामोडे साहब जरा हमारे फिरोज खान साहब के तरफ जरा ध्यान रखीए' म्हणत जोरदार फटकेबाजी केली. 

आमदार इम्तियाज जलील यांचा रोख कुणावर होता, आणि त्यांना नेमके काय सुचवायचे होते हे तिथे उपस्थित असलेल्या महापौर, आमदारांसह एमआयएमच्या 
नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. जलील यांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. प्रत्येक जण जलील यांच्या टायमिंगला दाद देत होता, तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते फिरोज खान यांचा मात्र चेहरा पडला होता. 

संबंधित लेख