jalil and shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

निवडणुका आल्यावर शिवसेनेला राममंदिर आठवले - इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचे राजकारण मंदिर, मस्जिद अन संभाजीनगर एवढ्यावरच सुरु आहे. निवडणुका आल्यावर यांना राममंदिर आठवले आहे असा टोला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना व खासदार खैरे यांना लगावला आहे. औरंगाबादहून अयोध्येमध्ये पाचशेच्यावर शिवसैनिक रवाना झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेशी संबंधित एका विषयावर आमदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत शिवसेनेने हाती घेतलेल्या राममंदीराच्या मुद्दयाच्या संदर्भात टिका केली. 

शिवसेनेने आता नवीन घोषणा दिली आहे, आधी मंदिर मग सरकार याचा समाचार घेताना आमदार इम्तियाज जलील यांनी सवाल केला की, आधी मंदिर मग सरकार हे तुम्हाला आता सुचलेय का. 2014 मध्ये तुमचेच सरकार आले होते त्यावेळी तुम्हाला हा नारा आठवला नाही का शिवसेनेचे जर राममंदिराला प्रधान्य होते तर मग शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झालीच कशासाठी. दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या की रामाचे मंदिर दिसू लागते असा आरोपही जलील यांनी केले. 

राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजप युतीचेच सरकार आहे. सरकारने पुढाकार घेउन न्यायालयात पाठपुरावा करावा, लवकर लवकर या प्रकरणी सुनावणी घेउन निर्णय देण्यासाठी सरकार का पुढाकार घेत नाहीत. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य राहील असे सांगून इतकी वर्ष राममंदीरासाठी वाट पाहिली आता अजून काही महिने थांबण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

वंचित आघाडीला सहजपणाने घेउ नका 
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने अनेक पक्ष धास्तावुन गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचा भाजपला फायदा होईल असे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत वंचित आघाडी नसतानाही त्यावेळी तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कुठे मोठे यश मिळाले होते अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला. प्रकाश आंबेडकरांना खासदाराच्या रुपात आम्ही पाहू इच्छितो असे कॉंग्रेसकडून सांगीतले जाते. परंतू प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत युती करायची असल्यास वंचित आघाडीला हव्या असलेल्या जागांबाबत मात्र कॉंग्रेसकडून साधा उल्लेखही केला जात आही. यावरुन वंचित आघाडीला कॉंग्रेस गांभीर्याने घेत नसल्याचे सांगतानाच आमदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला इतक्‍या सहजतने घेणे कॉंग्रेसला परवडणारे नसल्याचा इशारा दिला आहे. 

संबंधित लेख