jalil and aurangabad bjp | Sarkarnama

भाजपचे वाजपेयीप्रेम केवळ दिखावा - इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या सय्यद मतीन याच्यावर भाजपचे नगरसेवक तुटून पडले होते. एमआयएमने त्याची पक्षातून हकालपट्टी करावी, त्याला निलंबित करावे अशी मागणीही भाजपने लावून धरली होती. मग उपमहापौर विजय औताडे यांनी वाजपेयींच्या अस्थिकलशा सोबत सेल्फी काढून त्यांच्याबद्दल दाखवलेले प्रेम भाजपला मान्य आहे का ? असा खणखणीत सवाल करत भाजपचे वाजपेयी प्रेम केवळ दिखावा असल्याची खरमरीत टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. 

उपमहापौरांच्या सेल्फी प्रकरणावर सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले, खर तर सय्यद मतीनचे सभागृहात चुकलेच. दिवंगत नेत्याला श्रध्दांजली वाहण्याची भाजप नेत्यांची ही "सेल्फी' पध्दत त्याला माहित नव्हती. त्यामुळे त्याला वाजपेयींचा अपमान केला म्हणून सभागृहात मार खावा लागला. देशाचे मोठे आणि भाजपचे पितृतुल्य नेते दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन होऊन आठवडा देखील झाला नाही. आणि पक्षातले पदाधिकारी त्यांच्या अस्थिकलशासमोर उभे राहून सेल्फी काढतात यावरूनच त्यांचे वाजपेयी प्रेम सिध्द होते. 

मतीन याची एमआयएममधून हाकालपट्टी करा अशी मागणी करत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवला. आता उपमहापौर विजय औताडे यांच्यावर भाजप काय कारवाई करते हेच आम्हाला बघायचे आहे. की "अपनो के लिए अलग न्याय और गैरो के लिय अलग न्याय' हेच भाजपचे धोरण आहे हे लवकरच दिसून येईल असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. 

संबंधित लेख