Jalgav : Ncp critisizes Khadse and Suresh Jain | Sarkarnama

.... . तर राष्ट्रवादी जळगावच्या चौक चौकात लावणार भज्यांचे स्टॉल!

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 जुलै 2017

जळगाव : भाजपचे नेते एकनाथराव खडसे व शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्या "भजे ' डिप्लोमसीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वादळ उठले आहे.यावर मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

भजे खावू खालून मने शुध्द होत असतील तर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हयात एकमेकांशी कट्टर वाद असलेल्या लोकांचे वाद मिटविण्यासाठी चौकाचौकात भजे स्टॉल सुरू करेल. जिल्हाध्यक्ष डॉ.सतीष पाटील "सरकारनामा' बोलत होते. 

भाजपचे नेते एकनाथराव खडसे व शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी काल जळगावात एका कार्यक्रमात एकमेकांना भजे खावू खालून वाद मिटल्याचे जनतेला दाखविले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या मिलनाचे आश्‍चर्य वाटू लागले आहे. त्यावर बोलतांना राष्टवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणाले,

 " दोन्ही नेत्यांचे हसतांना फोटो पाहून बरे वाटले, "मिरची' आणि "बटाटा'भजी त्यांनी खावू घातली आहेत. परंतु ती पचेल अशीच खावू घातली असेल तर बरे ! नाही तर दोघांनाही त्रास व्हायचा. नक्‍की कुणाला त्रास होणार? हे आगामी काळात दिसून येईलच. एकमेकांना भजे खावून घालून दोघांचीही मने शुध्द झाली आहेत.

 दोघेही सत्तेतील पक्षातील नेते आहेत. त्यांनी आता एकदिलाने, एकमनाने जोरात कामाला लागले पाहिजे. युती सत्तेवर आल्यापासून जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, दोन्ही नेत्यांनी सत्तेतील आपले वजन वापरून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कामाला लागले पाहिजे. 

त्यांच्या मैत्रीचा जळगाव जिल्ह्याचा जनतेला आता लाभ होईल असे काम दोन्ही नेते एकदिलाने करतील असे आता वाटत आहे. मात्र दोन्ही नेत्यांची मने खरंच शुध्द झाली आणि जिल्ह्याचा विकास झाल्याचे दिसून आले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चौकाचौकात भज्याचे स्टॉल लावून "वाद'मिटवून मने शुध्द करण्याचा उपक्रम सुरू करेल

संबंधित लेख