Jalgav Loksabha : Shiv sena's R O Patil is testing waters | Sarkarnama

जळगाव लोकसभा : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या आर.ओ. पाटील यांची तयारी

कैलास शिंदे : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

जळगाव : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर एम.के.अण्णा पाटील यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीतील पराभवाचा एकमेव अपवाद वगळता गेल्या 25 वर्षापासून जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. मात्र आता प्रथमच या मतदार संघात शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली असून माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी आपल्या यशासाठी बांधणीही सुरू केली आहे. 

आर.ओ.तात्या पाटील हे शिवसेनेचे पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. दोन वेळा ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर या मतदार संघातून निवडून गेले आहेत. त्यानंतर याच मतदार संघातून त्यांचे पुतणे किशोर पाटील हे शिवसेनेचेच आमदार आहेत. आर.ओ.पाटील यांनी आता लोकसभेच्या रणांगणात उडी घेण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यानी लोकसभा निवडणूका स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून तयारी सुरू केली आहे. 

पक्षातर्फे अधिकृत उमदेवारी जाहिर झालेली नसली तरी पक्ष स्वतंत्रपणे लढला किंवा युती झाली तरीही जागा वाटपात जळगाव लोकसभा शिवसेनेनेच घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातून आर.ओ.पाटील उमेदवारी मिळणार हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी संपर्काची तयारी सुरू केली आहे. मतदार संघातील विविध कार्यक्रमात ते सहभाग घेत आहेत. पाचोरा येथील शिवतीर्थाजवळ असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात ते दररोज हजेरी लावून कार्यकर्त्यांशी तसेच नागरिकांशी संपर्क करीत आहेत. शिवसेना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक प्रथमच स्वतंत्रपणे लढणार असल्याने त्या दृष्टीने होत असलेली तयारी फायद्याची मानली जात आहे.

संबंधित लेख