Jalgaon's Chandulal Patel Became MLA because of Girish Mahajan | Sarkarnama

व्यवसायातील चंदूलाल पटेल गिरीश महाजनांच्या मैत्रीमुळे झाले आमदार 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

'व्यवसाय भला आणि आपले घर भले' अशा कुंटूबातील आमदार चंदूलाल पटेल हे आहेत त्यांच्या घराण्यात राजकीय गंध फारसा नाहीच. ते तर कधीच राजकारणात पडलेच नाही, मात्र, त्यांचे बंधू यशवंत पटेल भाजपचे नगरसेवक होते. त्यामुळे त्यावेळचे आमदार गिरीश महाजन हे पक्षाच्या कामानिमित्त पटेल यांच्या घरी येत होते. त्यातून चंदूलाल पटेल यांच्याशीही मैत्री झाली.

जळगाव : 'व्यवसाय भला आणि आपले घर भले' अशा कुंटूबातील आमदार चंदूलाल पटेल हे आहेत त्यांच्या घराण्यात राजकीय गंध फारसा नाहीच. ते तर कधीच राजकारणात पडलेच नाही, मात्र, त्यांचे बंधू यशवंत पटेल भाजपचे नगरसेवक होते. त्यामुळे त्यावेळचे आमदार गिरीश महाजन हे पक्षाच्या कामानिमित्त पटेल यांच्या घरी येत होते. त्यातून चंदूलाल पटेल यांच्याशीही मैत्री झाली. राजकारणात अनुभव असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेच्या माध्यमातून पटेल यांना चक्क भाजपचे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून आणले. व्यवसायातील ही मैत्री थेट आता आमदारकीपर्यंत सोबत आहे.
 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जामनेरचे तर चंदूलाल पटेल हे जळगावचे. पटेल यांचा वडिलोपार्जीत सॉमिल (लाकूड वखार) आहे. पटेलही त्याच व्यवसायात होते, परंतु नंतर त्यांनी पॅकेजिंग इंडस्ट्रीजमध्ये प्रवेश केला तसेच सोबत बिल्डर क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. त्यांचे बंधू यशवंत पटेल भाजपचे नगरसेवक होते. त्यावेळी भाजपचे शहरात कार्यालय नव्हते, त्यावेळी मोठे नेते आले तर पटेल यांच्या निवासस्थानी आमंत्रीत असत. राजकीय चर्चेसाठी तत्कालीन आमदार गिरीश महाजनही येत असत. त्यातून चंदूलाल पटेल यांची ओळख झाली. पुढे ते बांधकाम क्षेत्रात व्यवसायिक भागिदारही झाले. 

मध्यंतरी बंधू यशवंत पटेल यांची तब्बत बिघडल्यामुळे ते राजकारणातून दूर गेले त्यावेळी महाजन यांनी चंदूलाल पटेल यांना राजकारणात येण्याचा आग्रह केला. परंतु, पटेल यांनी आपल्याला त्यात काहीही रस नाही, आपला व्यवसाय भला असे सांगत टाळटाळ केली. मात्र, त्यांची मैत्री कायम होती. पुढे भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महाजन यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाले, तर महाजन हे फडणवीस यांच्या विश्‍वासातील मंत्री म्हणून ओळखले जावू लागले. 

अशातच जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या निवडणूका जाहिर झाल्या. त्यावेळी महाजन यांनी भाजपतर्फे आपले मित्र चंदूलाल पटेल यांना उमेदवारी दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले अन आपल्या या व्यवसायिक मित्राला विधीमंडळात आपल्यासोबत आमदारही केले. आता महाजन आपल्या या आमदार मित्राला राजकाणाचे धडेही देत आहेत. प्रत्येक कार्यक्रमात ते आमदार पटेल यांना सोबत घेत असतात. 

आमदार झाल्यानंतर प्रारंभी थोडे गडबडलेले पटेल आता मात्र राजकारणात सरावले आहेत. आता ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात त्यांच्या समस्याही सोडविता. आणि काही ठिकाणी भाषणही करतात. आमदार चंदूलाल पटेल मैत्रीबाबत म्हणतात, कोणताही स्वार्थ नसलेली आमची जिंदादिल मैत्री आहे. 

संबंधित लेख