Jalgaon Panchayat Raj Committee member absent | Sarkarnama

जळगावात पंचायतराज समिती दौऱ्यात निम्मेच सदस्य 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

जळगाव येथे पंचायत राज समितीचा दौरा आजपासून सुरू झाला. मात्र या दौऱ्यात निम्मेच सदस्य उपस्थित राहिल्याने सदस्यांनाच आता फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

जळगाव : जळगाव येथे पंचायत राज समितीचा दौरा आजपासून सुरू झाला. मात्र या दौऱ्यात निम्मेच सदस्य उपस्थित राहिल्याने सदस्यांनाच आता फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

जळगाव जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पंचायतराज समितीचा दौरा आजपासून दिवसाचा दौरा सुरू झाला आहे. आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण 28 सदस्य होते. त्यातील 22 सदस्यांनी दौऱ्याला येण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यातपैकी केवल 12 सदस्य आज उपस्थित राहिले आहे. त्यामुळे निम्मे सदस्य दौऱ्यात आलेच नाहीच. 

याबाबत थेट काही सदस्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की बारा सदस्य आले आहेत. उर्वरीत सदस्य सायंकाळपर्यंत येण्याची शक्‍यता आहे. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही नवीन सदस्य आलेले नव्हते. उलट आलेल्यातील काही सदस्य परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता समितीच्या सदस्यांना(आमदारांना) पाहणी दौऱ्यात फारसे स्वारस्य दिसून आले आहे. 
जळगाव येथे आज सकाळी ही समितीची अजिंठा विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून स्वागत केले. यावेळी झालेल्या बैठकित पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून विकासासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार केली. 

विशेष जळगाव जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या भाजपच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी शालेय पोषण आहाराच्या गैरव्यवहाराची तक्रार केली. राज्यात आपलेच सरकार असताना आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली. समितीचे अध्यक्ष आमदार पारवे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले आपण सरकारला याबाबत माहिती देणार आहोत असे आश्‍वासनहीं त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सानेगुरूजी सभागृहात समितीच्या सदस्यांची अधिकाऱ्यासमेवत बैठक घेण्यात पहिल्या दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या बैठकित शालेय पोषण आहाराच्या गैरव्यवहराचा मुद्यावरच अधिकच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, समितीचा कारभार पारदर्शन असून बैठक संपल्यानंतर सर्व माहिती प्रसिध्दी माध्यमाना दिली जाईल. 
 

संबंधित लेख