Jalgaon news - Sanjay Sawkare | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

भाजपचे आमदार सावकारे म्हणतात "मैं हूँ डॉन'! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 सप्टेंबर 2017

"डॉन' म्हटले की भल्याभल्यांच्या मनात धडकी भरते... राजकारण्यांना "डॉन' म्हटले की मनोमन आवडत असले तरी ते म्हणतात, "गप्प बसा! जाहीरपणे बोलू नका.' परंतु, भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे जाहीर कार्यक्रमातून सर्वांसमोर "मैं हूँ डॉन... मैं हूँ डॉन...' असे म्हणताना दिसले तर आश्‍चर्य वाटणारच. 

जळगाव : "डॉन' म्हटले की भल्याभल्यांच्या मनात धडकी भरते... राजकारण्यांना "डॉन' म्हटले की मनोमन आवडत असले तरी ते म्हणतात, "गप्प बसा! जाहीरपणे बोलू नका.' परंतु, भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे जाहीर कार्यक्रमातून सर्वांसमोर "मैं हूँ डॉन... मैं हूँ डॉन...' असे म्हणताना दिसले तर आश्‍चर्य वाटणारच. 

जळगाव जिल्ह्यात रेल्वेचे जंक्‍शन असलेले भुसावळ शहर कॉस्मोपॉलीटीयन शहर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे हे शहर नेहमीच वादात राहत असते. राजकीय घमासानीतही हे शहर आघाडीवरच आहे. यातूनही "जो जीता वही सिंकदर' अशी राजकीय स्थिती असते. सध्या, भुसावळच्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे भाजपतफे निवडून आले आहेत. आमदार म्हणून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना ते आमदार होते. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची संधीही मिळाली आहे. मात्र पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर भुसावळात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळाले आणि भाजप सत्तेत आली. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून सध्यातरी आमदार सावकारे वरचढ असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. त्यामुळेच कदाचित ते म्हणत असतील "अरे दिवानो मुझे पहचानो...मैं हूँ डॉन...' होय तेच म्हणाले. परंतु ते कोणत्याही राजकीय अथवा दादागिरीच्या दृष्टीकोनातून नाही तर चक्क त्यांनी ऑर्केस्ट्रात गीत सादर केले. 

संजय सावकारे हे उच्चशिक्षित (इंजिनिअर) आहेत तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्नेहसंमेलनातही भाग घेतलांय. ते उत्तम गायक तर आहेतच. परंतु चांगले नृत्यही करतात. भुसावळात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांना आपली कला सादर करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी "डॉन' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाजलेले "मै हूँ डॉन' हे गीत सादर केले, विशेष म्हणजे त्यांनी अस्सल गायकी थाटात संपूर्ण गीत म्हटले, उपस्थितांना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्याला दादही दिली. 

किशोरदा, रफींचे फॅन 
त्यांच्या या कलेबाबत अधिक माहिती घेतली असता त्यांना जुन्या गाण्यांची आवड. किशोरकुमार, मोहम्मद रफी त्यांचे आवडते गायक. लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणेही त्यांना भावतात. अभिनेत्यांमध्ये अमिताभ, राजेश खन्ना यांच्यासह नव्या पिढीचा आमिर खानही त्यांना आवडतो. कुठे संधी मिळाली, कुणी आग्रह केला तर हा कलाविष्कार सादर करायचा, आपणही आनंद घ्यायचा.. असे सावकारे म्हणतात. 

संबंधित लेख