Jalgaon news - Gulabrao patil | Sarkarnama

मुस्लिम समाज दूर जात असल्याची आझमींना भिती : गुलाबराव पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 जुलै 2017

मुस्लिम समाज अबु आझमी यांच्यापासून दूर जात असल्याने ते घाबरले आहेत. त्यामुळे ते "वंदे मातरम'सारखे मुद्दे काढून समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता समाज जागृत झाल्याने त्यांची ही खेळीही यशस्वी होणार नाही, असा टोला शिवसेनेचे उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

जळगाव : मुस्लिम समाज अबु आझमी यांच्यापासून दूर जात असल्याने ते घाबरले आहेत. त्यामुळे ते "वंदे मातरम'सारखे मुद्दे काढून समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता समाज जागृत झाल्याने त्यांची ही खेळीही यशस्वी होणार नाही, असा टोला शिवसेनेचे उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

जळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. "मुस्लीम वंदे मातरम् म्हणणार नाही' असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी विधानसभेत केले. त्यावर बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले, कि मुस्लीम समाजाची त्यांना साथ मिळत नसल्याने आझमी आता बिथरले आहेत, त्यामुळे ते आता असे मुद्दे काढून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वंदे मातरम म्हटलेच पाहिजे. त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मुस्लीम समाजही त्याला सहमत आहेच. परंतु आझमी यांच्यासारखे काही नेते असे मुद्दे काढून आपण समाजाचे हितचिंतक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र समाज आता जागृत झाल्याने त्यांच्या वक्‍तव्याला तेही फारसे महत्व देत नाही. आझमी यांनी आता असे समाजाला दिशाभूल करणारे वक्तव्य करण्यापेक्षा उत्तर प्रदेशात त्यांचा समाजवादी पक्षाचे आमदार फुटत आहे. हा पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्याकडे लक्ष द्यावे असे अवाहनही त्यांनी केले. 

संबंधित लेख