Jalgaon news agitation for water | Sarkarnama

जळगावच्या 'राष्ट्रवादी' जिल्हाध्यक्षांचे पाण्यासाठी उपोषण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

जिल्ह्यातील एरंडोल व पारोळा तालुक्‍यात दृष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे. गावांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. अशा त्यामुळे गिरणाधरणातून पाणी सोडावे अशी मागणी करूनही शासनाने लक्ष न दिल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल व पारोळा तालुक्‍यात दृष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे. गावांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. अशा त्यामुळे गिरणाधरणातून पाणी सोडावे अशी मागणी करूनही शासनाने लक्ष न दिल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

एरंडोल पारोळा मतदार संघास शासन सापत्न वागणूक देत असल्याचा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी थेट आरोप केला आहे. टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून केली होती. मात्र, त्यानंतरही शासनाने कारवाई न केल्यामुळे अखेर आज सकाळपासून त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

याबाबत त्यांनी म्हटले आहे, की 'अंजणी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अंजनी धरण यावर्षी कोरडे असल्याने एरंडोल तालुक्‍यात भीषण पाणी टंचाई भेडसावणार आहे. अंजनी धरणात पाणी आणण्यासाठी जामदा कालव्यातून व्यवस्था आहे. प्रशासनाने अंजनी धरण गिरणेच्या पाण्याव्दारे रिचार्ज केले तर एरंडोल तालुक्‍याची पाणीसमस्या मिटणार आहे.' तात्काळ या समस्येकडे लक्ष देवून धरणात पाणी सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

संबंधित लेख