jalgaon news | Sarkarnama

भाजप-शिवसेना जळगावातील युतीला मुख्यमंत्र्याची सहमती : सुरेशदादा जैन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

जळगाव : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे राज्यात वाद असले तरी जळगाव महापालिका निवडणूकीत मात्र शिवसेना -भाजप युती करण्यास राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दिली आहे. अशी माहिती शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली. 

जळगाव येथे महापालिकेने खासगी तत्वावर चालविण्यास दिलेल्या कोकीळ गुरूजी जलतरण तलावाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात जैन बोलत होते. ते म्हणाले, बुलडाणा येथे आज मुख्यमंत्र्याच्या एका उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर े मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व मी तिघांची चर्चा झाली.

यावेळी आपण सांगितले,की भाजप-सेनेचे राज्यात काहीही वाद असले तरी जळगावात मात्र दोन्ही पक्षाची युती झाली पाहिजे. महापालिका निवडणूक युतीतर्फेच लढविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनीही त्यांला सहमती दर्शविली. त्यामुळे राज्यात दोन्ही पक्षात काहीही वाद असले तरी जळगाव महापालिका निवडणूका मात्र शिवसेना भाजप युतीतर्फेच लढविण्यात येतील. 

गेल्या पाच वर्षात जळगाव शहराचा विकास झालेला नाही, असेही जैन यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी दिलेला 25 कोटीही निधीही खर्च होवू शकलेला नाही. त्यामुळे जळगावच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जळगाव महापालिकेत जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीचीच सत्ता आहे. या ठिकाणी सद्या भाजप मात्र विरोधीपक्ष आहे. 
 
संबंधित लेख